मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नीच्या कारला ट्रॅव्हल्सची धडक
राजश्री मुंडे किरकोळ जखमी.

बीड : कृषी मंत्री तथा, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे तुळजापूरचे दर्शन घेऊन मुंबईकडे जात असताना आज पहाटे पाच वाजण्याचे सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी येथे कारला ट्रव्हलन बसने जोराची धडक दिली. या अपघातामध्ये राजश्री मुंडे किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे या कारने जात होत्या. त्यांच्या कारने पुणे सोलापुर महामार्गावर सोरतापवाडी येथे ट्रॅव्हल्स बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये मुंडे यांच्या कारचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने मुंडे यांना गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती आहे. राजश्री मुंडे या किरकोळ जखमी आहेत.या अपघाताची माहिती समजतात स्थानिक नागरिकानी जखमींना मदत केली.पोलीस घटनास्थळी दाखल झाले अधिक तपास करत आहे.