उघड्या डीपीच्या शॉक लागून वानर जखमी !
महावितरणचां गलथान कारभार,जीवितहानी झाल्यास महावितरण जबाबदार.

बीड (प्रतिनिधी) बीड शहरातील महावितरणचा गलथान कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.बीड शहरात रहदारीच्या ठिकाणी, मुख्य रस्त्यावर उघड्या डीपी असल्याचे दिसत आहे. दुरुस्तीच्या नावाखाली आलेला निधीचा वापर दुरुस्तीसाठी होत नसून महावितरण चे अधिकारी, कर्मचारी फक्त स्वतःच्या फायद्यासाठी करून घेत असल्याचे दिसत आहे. बीड शहरातील उघड्या डीपीमुळे एका वानराला उघड्या डीपीचा शॉक लागू वानर जखमी झाले, त्याच्या हाताच्या पंजाला विजेचा जोरदार झटका लागल्याने त्याच्या हाताला जखम होऊन ते जखमी ते म्रत अवस्थेत आढळले.ही घटना बीड शहरातील हनुमान नगर भागात आढळले घडली. स्थानिक नागरिकांनी,पशुप्रेमीनी पेठ शिल्लड ला या दुर्घटनेची माहिती दिली,शिल्डच्या सदस्यांनी तात्काळ हनुमान नगर मध्ये जाऊन डॉ. जोगदंड यांनी जखमी वानरावर उपचार केले. जखमी वानराला औषधं उपचार करून एका मुक्या प्राण्याचा जीव वाचवला वानर जखमी असल्याने त्याच्या आसपास ही कोणाला येऊ देत नव्हते परंतु डॉ. व पेट शिल्ड च्या टीमने त्यावर उपचार केले. वनपरिक्षेत्र अधिकारी अशोक काकडे यांना जखमी वानराची माहिती दिल्यावर त्यांनी आपले वन कर्मचारी आल्यावर वाणाराला कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आले.वणाराचा जीव वाचवल्याने स्थानिक नागरिकांनी व वन अधिकाऱ्यांनी पेट शिल्ड च्या सदस्याचे आभार व्यक्त केले. शहरातील उघड्या डीपी मुळे मोठ्या प्राण्याचा जीव जाता जाता वाचला पण एखाद्या मुलाला किंवा नागरिकांना उघड्या डीपी मुळे शॉक लागून दुर्घटना झाली तर याची सर्व जबाबदारी महावितरणची राहील त्यामुळे शहरातील उघड्या डीपी, जमिनी दगत असलेल्या डीपी तात्काळ दुरुस्त करून त्या डीपीला लॉक लावण्यात यावे. तरच एखादी दुर्घटना टळू शकते.