ताज्या घडामोडी

बीड शहरातील कॉफी शॉप वर पोलिसांची कारवाई !

कॉफी शॉप मध्ये जोडपे अशील्ल चाळे करताना रंगेहात पकडले.

 

 

आनंद वीर (प्रतिनिधी) बीड शहरात कॉफी शॉप च्या प्रमाणात वाढ झाली असून शाळा, कॉलेज,कोचिंग क्लासेस च्या जवळ अनेक कॉफी शॉप असल्याने शाळकरी तसेच महाविद्यालयीन मुलं-मुली कॉफी शॉप चा आसरा घेत अशिल्ल चाळे करत असल्याचे दिसत आहे.आज दिनांक 18/10/2024. शुक्रवार रोजी शिवाजीनगर पोलीसांना गुप्त माहिती मिळाली की,शहरातील कॅनॉल रोड येथील स्टार बर्ड्स कॅफेचे चालक/मालक यांनी स्टार बर्ड कॅफेच्या ठिकाणी मुलामुलींना बसण्यासाठी व अश्लिल चाळे व बेशिस्त वर्तन करण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिली आहे.सदर ठिकाणी पोलीसांनी छापा टाकला असता,सदर कॅफेचा चालक/मालक राहुल मसुनाथ गावडे वय 23 वर्षे, ह.मु. राधाकृष्ण नगरी, बीड रा. नवगण राजुरी ता. जि.बीड हा काउंटरवर मिळून आला. व सदर कॅफेची पोउपनि शिंगणे यांनी आत जावून पाहणी केली असता, आतमध्ये 10 बाय 10 बाय रुंदीचे कंपार्टमेंट प्लायवुड ने वेगवेगळे करुन त्यामध्ये खुर्ची व टेबल ठेवलेले दिसून आले.जोडप्यांना त्या कंपार्टमेंट मध्ये मंद उजेड करण्यात आलेला होता. त्यात काही जोडपी अश्लिल चाळे करताना दिसले.तेव्हा त्यांना नाव पत्ता विचारुन त्यांचे ओळखपत्राची खात्री करुन त्यांना योग्य ती समज देवुन सोडुन देण्यात आले आहे.त्या कॉफी शॉपची पाहणी केली असता कॉफी शॉपच्या रुममध्ये 10 बाय 10 लांबी रुंदीचे प्लायवुडचे 03 कप्पे असून त्यास बाहेरचे बाजुने वन वे ग्लास एका बाजुने दिसणाऱ्या काळया काचेचे दरवाजे बसविलेले दिसून आले. कॉफी शॉप मध्ये दर्शनी भागात कॉफी शॉपचा कुठलाही परवाना दिसुन आला नाही. तसेच कॉफी शॉप चालकाने आलेल्या मुलांमुलींचे कसल्याची प्रकारचे रेकॉर्ड ठेवल्याचे दिसुन आले नाही. या कॉफी शॉप मध्ये ठिकाणी मुलामुलींना बसण्यासाठी खुर्चा व टेबल ठेवुन मंद उजेडात अश्लिल चाळे व बेशिस्त वर्तन करण्यासाठी जागा उपलब्ध करुन दिल्याने कॉपी शॉप मालक राहुल मसुनाथ गावडे याचे विरुध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 129, 131 अन्वये गुन्हा नोंद करुन पुढील तपास पो.उप.नि.निमोणे करत आहे. शिवाजीनगर पोलीस ठाणे मार्फत यापुढेही यासारखे विनापरवाना व बेकायदेशीर कॉफी शॉप चालवणाऱ्या कॉफी शॉप वर कारवाई करण्यात येणार आहे.ही कारवाई बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ,अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस उपअधिक्षक विश्वंबर गोल्डे,पोलीस निरीक्षक खेडकर यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.अमोल शिंगणे,पो.उप.नि.निमोणे व सोबत सोबत पो.ह./ 1664 आघाव, पो.शि. 983 सारणिकर, म.पो.ह./1412 मस्के यांनी केली.

संपादक- गंमत भंडारी | का.संपादक- आर.डी. जोशी

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button