गोळीबार प्रकरणातील आरोपींना भेटण्यासाठी पोलिसांनीच घातला धिंगाणा !
चार पोलीस निलंबित दहा जनावर गुन्हा दाखल.

आनंद वीर (प्रतिनिधी)मागील वर्षी नगर रोड जवळ दोन गटात भांडण झाल्याने त्याचे रूपांतर मारहाण व गोळीबारात झाले होते.या प्रकरणी दोन्ही गटाकडून गुन्हे दाखल झाले नव्हते परंतु पोलिसांनी स्वतःच फिर्यादी होऊन दोन्ही गटातील लोकांवर मारहाण,307,327,/23 नुसार गुन्हा दाखल करण्यात आले होते. त्या गुन्ह्यातील एक वर्षापासून फरार आरोपी विपुल गायकवाड याला पोलिसांनी अटक करण्यात आले होते. त्याला अटक केल्यानंतर पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यामुळे तो शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत होता.त्याला बीड येथील शहर पोलीस ठाण्यात ३०७ प्रकरणातील आरोपीला भेटण्यासाठी थेट चार पोलिसांनीच मद्यप्राशन करून धिंगाणा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.पोलिस कर्मचारीच दारू पिऊन आरोपीला भेटण्यासाठी धूडगुस घालत असल्यामुळे खळबळ उडाली आहे. विपुलला भेटण्यासाठी रात्रीच्या सुमारास १० ते १२ जण दारूच्या नशेत आले होते.यावेळी पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेले ठाणे अंमलदार रेडेकर यांनी या सर्वांना भेटीपासून रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र दारूच्या नशेत असलेल्या लोकांनी रेडेकर यांच्याशी हुज्जत घालत सरकारी कामात अडथळा आणला.नंतर त्या पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये व दहा ते बारा हजारामध्ये आपापसात वाद झाला त्यात एका पोलीस कर्मचाऱ्यांचे डोके फुटले त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे कायद्याची पायमल्ली करण्यात चार पोलीस कर्मचारी देखील सामील आहेत.यात मुख्यालयातील विनायक जोगदंड, आर.सी.पी.मधील खेडकर, गेवराईचे पोलीस कर्मचारी गणेश कुटे,शहर पोलीस ठाण्यातील कर्मचारी संदीप कांबळे यांनी धिंगाणा घातल्यामुळे त्यांच्यावर ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस आधीक्षकांना याची माहिती मिळताच त्यांनी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ यांना चौकशी करण्याचे, सीसीटीव्ही तपासण्याचे आदेश दिले.त्यात ते पोलीस कर्मचारी व 10 ते 12 जण खेडेकर यांच्याशी उच्च घालत असल्याचे सी.सी.टीव्ही.मध्ये दिसल्याने त्या चार पोलीस कर्मचाऱ्यावर तात्काळ निलंबनची कारवाई करण्यात आली. व दहा ते बारा जनावर पोलिसां सोबत हुज्जत घातल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.