टिप्पर च्या धडकेत महिला जागीच ठार,एक गंभीर जखमी
बीड बायपास संभाजी राजे चौकात पुन्हा एक बळी.

आनंद वीर(प्रतिनीधी) सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरील बार्शी नाका बायपास, संभाजी राजे चौक येथे एका महिला मोटारसायकलवर मांजरसुंबाकडे जात असताना टिप्पर क्रमांक (एम.एच.23-एयू-4670) ने मोटारसायकल (एम.एच.23-एएच-8435) ला जोराची धडक दिल्याची घटना दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातामध्ये शिरीन बाबू जनिमिया वय 72 वर्षे रा पाली या महिलेचा जागीच मृत्यू झाला अन्य एक जखमी झाला आहे. टिप्पर सोडून चालक फरार झाला.अपघात झाला त्यावेळी लोकांनी एकच गर्दी गेली होती. बीड ग्रामीण पोलीस ठाण्याची कर्मचारी आनंद मस्केना या अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन मृत झालेल्या महिलेला व तिच्या पतीला रुग्णवाहिकेत बीड येथे शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे आनंद मस्के,पो.ह.निर्धार यांनी दोन्ही वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली.