कार्यकर्ते व जनतेच्या आग्रहास्तव निवडणूक लढवणार ! ज्योतीताई मेटे
शिवसंग्राम कडून निवडणूक लढवणार व जिंकणार सुद्धा,ज्योतीताई मेटे यांची सडेतोड मुलाखत.

वीर(प्रतिनिधी) शिवसंग्रामच्या अध्यक्ष व विनायकराव मेटे यांच्या पत्नी ज्योतीताई मेटे ह्या 2024 ची विधानसभा निवडणूक कार्यकर्ते व बीडच्या जनतेच्या आग्रहास्तव लढणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले. दिवंगत नेते विनायकराव मेटे यांचे निधन झाल्या नंतर शिवसंग्राम ची जबाबदारी ज्योतीताई मेटे यांनी खंबीरपणे सांभाळली असून, त्या वर्ग एकच्या अधिकारी असताना देखील विनायकराव मेटे यांचा वारसा पुढे चालवण्यासाठी खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत. त्यांना बीडच्या जनतेने देखील मेटे साहेबांच्या नंतर ताकतीने सोबत राहिले व साथ देली. मेटे साहेब यांनी बीड जिल्ह्या विविध तालुके,भागांमध्ये,शहरात केलेला विकासाच्या जोरावर जनतेच्या मनावर राज्य केले आहे. ज्योतीताई मेटे यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही तरी अपक्ष लढण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. त्यांना वेळी तालुक्यातील जनता नक्कीच साथ देईल असा विश्वास ज्योतीताई मेटे यांनी बोलून दाखवला.