उमेदवार लढवायचे का पडायचे?आज ठरणार !
समाजबांधवा समोरच निर्णय जाहीर करणार...जरांगे पाटील

आनंद वीर (प्रतिनीधी)मराठा समाजाला आरक्षण न दिल्याने मराठा समाजात शिंदे सरकार बद्दल संतापाची लाट पसरली असून, विधानसभेच्या तारखा जाहीर झाल्या आहेत.येत्या काही दिवसावर विधानसभा निवडणूक आली असल्याने निवडणुकीत उमेदवार पाडायचे की उमेदवार उभे करत लढायचं यासाठीच समाज बांधवांसमोर आज निर्णायक बैठक होणार आहे. यावेळी या बैठकीला जेवढे समाजबांधव येतील त्यांच्या समोरच आम्ही निर्णय जाहीर करणार, अशी माहिती मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. राज्यात महाविकास आघाडी असो की महायुती त्यांना संताजी धनाजी सारख पाण्यात मीच एकटाच दिसतो. माझ्यावर कोणाचाच अत्र चालू शकत नाही. त्यामुळे उद्या वेळ आली तर मी मराठ्यांसाठी मी मरेलही. सरकारकडे आणि विरोधकांकडे शेवटच अख तेच आहे. एक तर मला मारून टाकावे लागल. मात्र मी मरेल पण पैशावर आणि पदावर फुटू शकत नाही. माझ्या जवळच्या असणार्या लोकांना देऊन जर तुम्ही डाग लावण्याचा प्रयत्न केला असल तर तो घेणारा संपणार आणि देणारा सुद्धा संपवणार, असा इशारा ही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिला आहे.आता या निवडणुकीमध्ये निर्णायक मतदान हे मराठ्यांचे आहे. आता रणशिंग फुंकले आहे. लढाईला उतरायचं म्हणजे तलवार काढावी लागेल. सरकारने मराठा आरक्षणाबाबत आमची आशा संपवली असल्याचे त्यांनी म्हटले होते. दरम्यान, मनोज जरांगे पाटील आगामी विधानसभा निवडणुकीत उमेदवार पाडायचे की लढवायचे आज याच्यावर निर्णय होणार आहे. माझ्या विरोधात खूप मोठा डाव रचला आहे ■ लढायचं ठरलं तर आमच्यासाठी वेळ कमी नाही. आमची गेल्या १३ महिन्यापासून तयारी सुरू आहे.महाविकास आघाडी आणि महायुतीकडे देखील टफ उमेदवार आहेत. मात्र यातून त्यांना द्यायचा एक आहे. तसेच माझ्याकडे पण लय इच्छुक आहेत. आम्ही एक जरी उमेदवार दिला १०० जरी इच्छुक असले तर सर्वजण एकाचाच बाजूला उभे राहतील. २० आणि २५ दिवसात माझ्या विरोधात खूप मोठा डाव रचला आहे. केंद्र आणि राज्यातल्या कोणत्यातरी एका नेत्याकडे ताकद पुरवली आहे. त्याच्या पाठीशी कॅम्पिंनिग होणार, वेळ आली तर त्याच्या नावाची समाजासमोर चिरफाड करणार. मला या चळवळीतून खतम करायचा, गैरसमज कसा फैलावयचा याची कंपनिग होणार आहे. निर्णय उद्या काय होईल माहिती नाही. पण जे काही ठरेल एक ही गरीब सामान्य ओबीसी सहित मी त्यांना वापस जाऊ देणार नाही. २०२४ मध्ये ७५ वर्षात बघितलेले स्वप्न साकार होईल, त्यांचा न्यायचा दिवस येईल. मी आतापर्यंत काही गाव खेड्यातल्या ओबीसीला दुखावलं नाही, मी दुखावणार असतो तर त्याच टायमाला बोललो असतो फक्त मी त्या येवल्यावाल्याला बोललो, त्याच्या समाजाला सुद्धा नाही, अशी स्पष्टोक्ती मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिला आहे. उमेदवार लढवायची की पाडायचे?या आजच्या निर्णयाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.