
आनंद वीर(प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात किरकोळ कारणावरून गोळीबाराच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे.गेल्या काही महिन्यात परळी मध्ये गोळीबारात एक ठार झाला होता.नेकनुर पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या मुळकवाडी जवळ रात्री गोळीबाराची घटना घडली आहे.पोलिसात निवेदन दिल्याच्या माहिती वरून स्कॉर्पिओतून आलेल्या तिघांनी गोळीबार केल्याची घटना शनिवारी रात्री 10:45 च्या सुमारास घडली. या गोळीबारात एक जण जखमी झाला आहे. मांजरसुंबा लिंबागणेश रोडवर असलेल्या मुळुकवाडी जवळ संदीप गोरख तांदळे वय 28 वर्ष रा.हिंगणी खुर्द ता. बीडहोते.यावेळी स्कॉर्पिओ गाडी क्र. एम एच 23 बी डब्ल्यू 7689 मधून आणखी दोघांना सोबत घेऊन आलेल्या बाळा उर्फ विजयसिंह रामकिसन बांगर रा.पाटोदा याने संदीपतांदळे यास पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनाच्या रागातून जीवे मारण्याच्या उद्देशाने स्वतः जवळ असलेली पिस्तूल रोखून चार राऊंड फायर केले. यामध्ये संदीप तांदळे याच्या मांडीला गोळी घासून गेली यात तो जखमी झाला आहे.त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.याप्रकरणी बाळा बांगर सह अन्य दोन आरोपी विरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात कलम 109 भारतीय दंड संहिता संहिता कलम 3,25,27 भारतीय हत्यार अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गोळेबाराच्या घटनेने एकच खळबळ उडाली असून पुढील तपास नेकनूर पोलीस करत आहेत.