
आनंद वीर(प्रतिनिधी)बीड जिल्ह्यात किरकोळ कारणावरून गोळीबाराच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे.मीसुर न फुटलेले बरेच तरुण मुल,तरुण पिस्टल बाळगत आहेत.याकडे बीड पोलीस अधीक्षक यांनी गांभीर्याने पाहण्याची आज गरज आहे.नेकनूर पोलिसात दिल्याल्या तक्रारीत स्कॉर्पिओतून आलेल्या तिघांनी गोळीबार केल्याची घटना शनिवारी रात्री 10:45 च्या सुमारास घडली.या गोळीबारात एक जण जखमी झाला आहे. मांजरसुंबा लिंबागणेश रोडवर असलेल्या मुळुकवाडी जवळ संदीप गोरख तांदळे वय 28 वर्ष रा.हिंगणी खुर्द ता. बीडहोते.यावेळी स्कॉर्पिओ गाडी क्र. एम एच 23 बी डब्ल्यू 7689 मधून आणखी दोघांना सोबत घेऊन आलेल्या बाळा उर्फ विजयसिंह रामकिसन बांगर रा.पाटोदा याने संदीप तांदळे यास पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनाच्या रागातून जीवे मारण्याच्या उद्देशाने स्वतः जवळ असलेली पिस्तूल रोखून चार राऊंड फायर केले. यामध्ये संदीप तांदळे याच्या मांडीला गोळी घासून गेली यात तो जखमी झाला आहे.त्याला उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.याप्रकरणी बाळा बांगर सह अन्य दोन आरोपी विरोधात नेकनूर पोलीस ठाण्यात कलम 109 भारतीय दंड संहिता संहिता कलम 3,25,27 भारतीय हत्यार अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गोळीबाराच्या या घटनेने एकच खळबळ उडाली असून पुढील तपास नेकनूर पोलीस करत आहेत.