शिवसंग्राम च्या ज्योतीताई मेटे यांचा राष्ट्रवादी गटात प्रवेश!
बीडच्या राजकारणात बदल होणार.

वीर(प्रतिनिधी) शिवसंग्राम च्या अध्यक्ष ज्योतीताई विनायकराव मेटे यांनी आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. दिवंगत नेते विनायकराव मेटे यांनी शिवसंग्राम पक्ष स्थापन करून महाराष्ट्रामध्ये विविध पदाधिकारी व कार्यकर्ते जोडले होते.महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिवसंग्राम चे नाव अग्रस्थानी होते. लोकसभा निवडणुकीमध्ये ज्योतीताई मेटे या उमेदवार होते परंतु त्यांना थांबवण्यात आल्याने बीड जिल्ह्यातील शिवसंग्राम चे कार्यकर्ते पदाधिकारी नाराज झाले होते. त्यामुळे आता विधानसभा निवडणूक लढवावी अशी कार्यकर्ते व जनतेची मागणी होती. विधानसभा निवडणूक येत्या काही दिवसांवर आल्याने ज्योतीताई मेटे यांनी प्रवेश केल्याचे बोलले जात आहे. ज्योतीताई यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाची उमेदवारी मिळते का? असा प्रश्न बीड मतदारसंघातील मतदारांना पडला असून लवकरच उमेदवारी बाबत निर्णय होणार असल्याचे बोलले जात आहे.आज मुंबई येथे राष्ट्रवादी चे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रियाताई सुळे,जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आज प्रवेश सोहळा पार पडला. राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्याने बीड जिल्ह्याचे राजकारणात निश्चितच बदल होणार असल्याचे बोलले जात आहे.