ताज्या घडामोडी

संतापजनक.दहा वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार.

तीन नेपाळ्या विरोधात गुन्हा दाखल,नराधम अटकेत.

 वीर(प्रतिनिधी)१० वर्षाच्या अल्पवयीन,मुलीस शंभर रुपयासह चिकन खायला देण्याचे आमिष दाखवून बालिकेच्याच जुन्या घरात तिघा नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना ३ ऑगस्ट रोजी घडली. मात्र या घटनेची कुठे वाच्यता केल्यास सदरील बालिकेला जिवे मारण्याची धमकी संबंधित नराधम देत होते. त्यामुळे ती याबाबत कुठे वाच्यता केली नाही. मात्र ती शाळेत जेव्हा गेली तेव्हा तिला उठण्या- बसण्यासाठी त्रास होऊ लागला, ते शिक्षीकेने आणि घरातील आईलाही जाणवले तेव्हा तिला विश्वासात घेऊन विचारले असता सदरचा घटनाक्रम आणि किळसवाणा प्रकार तिने आपल्या आईला सांगितला. तेव्हा पिडितेच्या आईने नेकनूर पोलिसात येऊन तक्रार दिली.या घटनेत तीन आरोपी असून ते सध्या फरार आहेत.याबाबत अधिक असे की, या दुर्दैवी घटनेतील पिडित मुलगी ही चौसाळा शहरातील आझाद नगरमध्ये आपल्या आई वडिलांसह राहते. याठिकाणी उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी येथील आशिफ कुमार चौधरी ऊर्फ कल्लू नेपाळी याचे चायनिजचे दुकान आहे. ३ ऑगस्ट रोजी १०वर्षीय पिडित मुलीला कल्लू नेपाळीसह वंजारवाडी येथील राजेंद्र रामलिंग चंदनशिवे, सागर रामलिंग चंदनशिवे या तिघांनी तिला जवळ बोलावून घेत शंभर रुपये देण्याचे आमिष दाखवले. त्याचबरोबर चिकन खायला देतो, म्हणत त्या बालिकेला तिच्याच जुन्या घरामध्ये नेले, त्या ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला. ही घटना कोणाला सांगितली तर तुझ्या आई वडिलास जिवे मारू, अशी धमकी दिली. घटना घडल्यानंतर सातत्याने बलात्कारी त्या मुलीला धमकावत होते. म्हणून ही घटना उघडकीस आली नाही. मात्र तिला बसण्या उठण्यास त्रास जाणवू लागला, ते तिच्या घरच्यांच्या लक्षात आले तेव्हा तिला विश्वासात घेऊन विचारले असता तिने स्वतःवर बेतलेली आपबिती सांगितली. तिच्या आईने समोर येत नेकनूर पोलिसात धाव घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून पिंक पथकाचे पोलीस निरीक्षक शेळके हे पुढील तपास करत आहेत. घटनास्थळी केज विभागाचे विभागीय अधिकारी कमलेश मिना व नेकनूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी यांनी भेट दिली आहे.

संपादक- गंमत भंडारी | का.संपादक- आर.डी. जोशी

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button