करुणा मुंडेनी घेतली मनोज जरांगे यांची भेट !
बीड,परळी मध्ये पाठिंबा देण्याची मागणी केली.

आनंद वीर (प्रतिनिधी)ः- शिवशक्ती स्वराज्य सेनेच्या संस्थापक अध्यक्षा करूणा मुंडे यांनी मराठा योद्धा मनोज जरांगे यांची भेट घेवून परळी आणि बीड विधानसभा निवडणुकीमध्ये पाठींबा देण्याची मागणी केली.मागील काही दिवसांपासून जिल्ह्यातील नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सक्षमपणे काम करणार्या करुणा मुंडे यांनी विधानसभा निवडणुकीमध्ये उतरणार असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रस्तापितांना घरचा आहेर देण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे सांगितले. विधानसभा निवडणुकीच्या बाबत सकारात्मक चर्चा करण्यातवली. करूणा मुंडेंकडून दुष्काळात जिल्ह्यातील अनेक गावांना मोफत पाणी पुरवठा करण्याचे सामाजिक कार्य केले आहे,बीड शासकीय रुग्णालयात रुग्णांना व नातेवाईकांना मोफत जेवण, गोरगरिबांना मदत त्याचबरोबर अनेक सामाजिक कार्यात अग्रेसर राहून समाजसेवा हिच ईश्वर सेवा म्हणून कायम समाजसेवेत राहत अहोरात्र नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्याचे काम करूणा मुंडे कडून काम केले जात आहे. प्रस्तापित लोकांना घरी बसविण्यासाठी अनेक विस्तापितांकडून एकत्र येत निवडणुकीला समोरे जावे लागणार असल्याने शिवशक्ती स्वराज्य पक्षाच्या अध्यक्षा करूणा मुंडे यांच्याकडून मराठा योद्धा मनोज जरांगे यांची भेट घेत निवडणुकीत सहकार्य करण्याची मागणी केली.