जनावरे चोरणारी टोळी बीड शहरात सक्रिय ! प्रतिकार करणाऱ्यावर केला हल्ला.
बीड शहरातून रोज जनावरे चोरी होत असल्याच्या तक्रारी,चोरीची घटना कॅमेरात कैद.

आनंद वीर (प्रतिनीधी) बीड शहरामध्ये मागील काही महिन्यापासून मुख्य रस्ता तसेच गल्लोगल्ली जनावर चोरी होण्याच्या प्रमाणत वाढ होत असून.जनावरे चोरणाऱ्या टोळीला पकडणे हे बीड पोलिसांपुढे आवाहन झाले आहे. मागील महिन्यातच सहयोग नगर,या आठवड्यात बालेपिर भागामध्ये रात्री जनावरे चोरून वाहनात घेऊन जातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. चोरट्यांनी बीड शहरातील पेठ बीड,गांधी नगर भागातून जाधव नामक व्यक्तीची गाय चोरून घेऊन जात असताना शैलेश गलधर यांना संशय आल्याने विना नंबर च्या वाहांनाची विचारपूस केली असता 10 ते 12 चोरट्यांनी शैलेश गलधर वर हल्ला करत चारचाकीचे काच फोडले,ही गाय दारातून पीकअप वाहनात चोरून व्हिडिओ समोर आला आहे. याची माहिती पेठ बीड पोलिसांना देऊन देखील त्यांनी तपासात दिरंगाई केल्याने,चोरट्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ केली, त्यामुळे गाय चोरणाऱ्याना पाठबळ मिळत असल्याचे दिसत आहे. आज दिनाक 21 ऑक्टोबर रोजी बीड पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन त्या जनावर चोरणाऱ्या, हल्ला करणाऱ्या टोळीचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे.त्यामुळे चोरट्याची दहशत वाढल्याचे दिसून येत आहे.चोरट्यांनी वाहनात आधीच जनावरे चोरल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे, तरीही त्यांनी जाधव यांची गाय गाडी टाकताना सीसीटीव्ही कॅमेरा दिसत आहे.या गाई कत्तलखान्यात विकत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.चोरांनी रात्री पाच हे सहा गायी चोरून घेऊन गेले. त्यामुळे या चोरांचा तपास करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी जाधव यांनी केली आहे.