ताज्या घडामोडी

जरांगे पाटलांचा आदेश आला तर विधानसभेसाठी तयार.ऍड.स्वप्निल गलधर

स्व.अमोल(भैय्या)गलधर यांचा जनसेवेचा वसा शेवटपर्यंत चालवणार.

आनंद वीर(प्रतिनिधी) बीड विधानसभा निवडणूक काही दिवसावर आली असताना मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये”इच्छुक उमेदवारांनी फॉर्म भरायचे त्यांनी भरावे”मी सांगितल्यावर फॉर्म परत घ्यावेत,अश्या सूचना दिल्याने बीड येथील युवा नेते तथा ऍड.स्वप्निल गलधर यांनी मागील काही महिन्यापासून भाजपला राम राम केला आहे.मनोज जरांगे पाटील यांचा आदेश आला तर बीड विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले. मनोज जरांगे यांनी उमेदवारी दिली तर 24 तास जनतेच्या सेवा करणार, बीडमध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढल्याने तरुनाच्या हाताला काम नाही, बीडमध्ये मोठे प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करणार,त्यामुळे युवक स्वावलंबी होईल, बीडला रेल्वे आली तर बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगार हा जिल्हा बाहेर जाणार नाही त्यामुळे रेल्वेचा प्रश्न मार्गी लावणार, तसेच बीड MIDC मोठे प्रकल्प,कारखाने नसल्याने तरुणाच्या हाताला काम नाही, त्यामुळे एमआयडीसी अध्यावत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. अंतरवाली सराटी येथे उपोषण दरम्यान झालेल्या लाठीमार व गोळीबाराच्या निषेधार्थ बीड जिल्हा बंदची हाक दिली होती,मी जातीयता मनात नसून फक्त मैत्री धर्म मानतो.300 सुशिक्षित रुणावर MPD सारखे गंभीर गुन्हे विनाकारण दाखल करण्यात आल्याने तचे शैक्षणिक आयुष्य उध्वस्त झाले आहे. त्यामुळे मराठा समाजावर अन्याय झाल्याची सांगितले,मुद्दामहून मराठा तरुणांना या सरकारने अडकवल्याचा आरोप स्वप्निल गलधर यांनी केला. मराठा समाजातील लोकांना कुणबी नोंदी सापडत असल्याने त्याला देखील विरोध होत आहे त्यामुळे ज्यांना कुणबी नोंदी सापडले आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी देखील मागणी केली आहे. जरांगे पाटील यांनी आदेश दिला तर मी विधानसभा निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे सांगून जरांगे पाटील यांचा आदेश अंतिम राहील असे सांगितले.

संपादक- गंमत भंडारी | का.संपादक- आर.डी. जोशी

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button