
आनंद वीर(प्रतिनिधी) बीड शहरातील एमआयडीसी भागामध्ये, ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका पत्त्याच्या क्लब,हॉटेलवर काम करणाऱ्या कामगारांमध्ये भांडण होऊन मारहाणीत एकाचा जीव गेला आहे. मयताच्या गळ्यावर खोलवर चाकूने वार झाल्याने त्याचा मृत्यू झाला. बीड ग्रामीण पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन प्रेत ताब्यात घेतले,मयताच्या गळ्यावर वार झाल्याने हा खून असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त करत आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या सोबत असणाऱ्या कामगारांना ताब्यात घेऊन, झाडाझडती घेउन विचारपूस केली असता त्याच्याकडे 500 रुपयाच्या नोटावर रक्त असल्याचे दिसले त्यावरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेत पोलीस खात्यात दाखवल्यावर त्यानेच खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी अधिक विचारपूस केली असता मयत सतत काम सांगत होता, त्यामुळे बऱ्याच दिवसापासून मनात राग धरून त्याला मारल्याची कबुली दिली, पोलिसांना आरोपीला ताब्यात घेतले असून बीड ग्रामीण ठाण्याचे पोलीस उप.नी. बाळराजे दराडे अधिक तपास करत आहेत.