
आनंदवीर(प्रतिनिधी) महाराष्ट्र सरकारने गुटख्यावर बंदी घातली तरी बीड जिल्ह्यात मात्र गुटखा खुलेआम विक्री होत आहे. याकडे अन्न व औषध प्रशासनाचे साफ दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये अन्न व औषध प्रशासनाने गुटखा विक्री करणारावर एकही कारवाई केली नसल्याने अधिकारी अर्थपूर्ण दुर्लक्ष तर करत नाहीत ना? असा प्रश्न पडला आहे.बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी अवैध धंद्यावर पोलिसांना कारवाया करण्याच्या सूचना दिल्याने ग्रामीण पोलीस ठाण्याचे पीएसआय बाळराजे दराडे यांना गुप्त माहिती मिळाली की बीडच्या जुन्या आरटीओ कार्यालयाजवळ एक कंटेनर भरून भरून जात आहे.दराडे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन तो कंटेनर अडवून तपासणी केली असता त्यात राजनिवास गुटखा लातूरकडे जात असल्याचे सांगण्यात आले.यात १ कोटींच्या पुढे माल असून कंटेनर आणि गुटखा ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकबाळराजे दराडे यांनी अवैध धंद्यावर केलेल्या कारवायामोठ्या प्रमाणावर चर्चेत आहेत. बुधवारी रात्री ८ च्यासुमारास त्यांनी जुन्या आरटीओ कार्यालयाजवळ सापळा रचून गुटख्याने भरलेल्या पूर्ण कंटेनर ताब्यात घेतला आहे.यात राजनिवास हाच गुटखा असून तो छत्रपती संभाजीनगरवरून लातूरकडे जात असल्याची प्राथमिक माहिती आहे. सपोनि बाळराजे दराडे यांनी केलेल्या या कारवाईमुळे गुटखा माफियांचे मात्र धाबे दणाणले आहेत. १ कोटींच्या पुढे सदर गुटखा असल्याची माहिती यगन मध्या हा कंटेनर पोलीस मुख्यालयात आणण्यात आला आहे.बुधवारी रात्री 8 च्या सुमारास त्यांनी जुन्या आरटीओ कार्यालया जवळ सापळा रचून गुटख्याने भरलेल्या पूर्ण कंटेनर ताब्यात घेतला आहे. यात राजनिवास हा गुटखा असून तो छत्रपती संभाजी नगरहून लातूरकडे जात असल्याची प्राथमिक माहिती आहे. सपोनि बाळराजे दराडे यांनी केलेल्या या कारवाईमुळे गुटखा माफियांचे मात्र धाबे दणाणले आहेत. दराडे यांनी केलेले या कारवाईत एक कोटीहून अधिक च्या किमतीचा गुटखा असल्याची माहिती दिली जात आहे.सध्या हा कंटेनर पोलीस मुख्यालयात घेऊन लावण्या आला असून अधिक तपास बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पीएसआय दराडे करत आहेत. ही कारवाई बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ,अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस उपाधीक्षक विश्वंभर गोल्डे, ग्रामीण पोलीस निरीक्षक बंटेवाड, पीएसआय बाळराजे दराडे, पो.आनंद मस्के यांनी केली.