न.प.इंजिनीयर अखिल फारोकी लाच घेताना पोलिसांच्या जाळ्यात !
एकाच दिवशी चार लाचखोर पोलिसांच्या ताब्यात.

आनंद वीर (प्रतिनिधी)बीड शहरातील बऱ्याच शासकीय कार्यालयामध्ये टेबलाखालून पैसे दिल्याशिवाय लाच घेतल्याशिवाय कामच करायचेच नाही,अशी शपथ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतली असल्याचे दिसत आहे. बीड विधानसभा काही दिवसांवर आल्याने आचारसंहिता लागू असल्याचे कारण सांगत कुठलेही काम करण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी केली जात आहे.दुपारी पिंपळनेर ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यासाठी लाच स्विकारताना होमगार्ड पकडला,तर सायंकाळी बीड नगर परिषदेतील कनिष्ठ अभियंतासह खाजगी इसमाला नऊ लाखांची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा करण्यात आला.पिंपळनेर पोलीस ठाणे हद्दीत वाळूचा ट्रॅक्टर चालू देण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्याने पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. ही लाच स्विकारताना होमगार्डला एसीबीने दि.23 बुधवारी रंगेहाथ पकडले.ही घटना ताजी असतानाच सायंकाळी बीड नगर पालिकेत बीड एसीबीने कारवाई केली.फारुकी अखिल आहेमद वकील आहेमद (वय 55, कनिष्ठ अभियंता, नगर परिषद) व खाजगी इसम किशोर कोंडीराम खुरमुरे (वय 35 रा. स्वराज्य नगर, बीड) अशी लाचखोरांची नावे आहेत. तक्रारदाराचे वडील व त्यांचे शेजारी यांचे बांधकाम परवाना काढण्यासाठी नगररचना विभाग,नगर परिषद, बीड येथील परवानगी देण्यासाठी फारुकी आखिल यांचे खाजगी मदतनीस किशोर खूरमुरे यांनी 12 लाख रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती नऊ लाख रुपये लाच रक्कम स्वतःसाठी मिळावी म्हणून ही लाच किशोर खुरमुरे यांचेकडे देण्यास सांगून प्रोत्साहन दिले म्हणून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. अखिल फारोखी यांच्याकडे रमाई घरकुल चां चार्ज असल्याने ते प्रत्येक घरकुलासाठी पाच हजाराची मागणी करतात अशा अनेक तक्रारी या आधी देखील नागरिक करत होते.ते आपल्या खाजगी कार्यालयांमध्ये खुल्या पैसे मागून फाईलवर सही करत होते, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई ही अटळ होती. एकाच दिवशी चार लाचखोरवर कारवाया झाल्याने लाचखोरीचे प्रमाणात किती वाढ झाली असे हे या कारवाई वरून दिसत आहे.ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव यांच्या मार्गदर्शक बीडचे पोलीस उपाधीक्षक शंकर शिंदे, पोलीस आमदार सांगळे, पो.गोरे,गिराम,राठोड, चालक मेहेत्रे गारदे,गवळी,खरमाडे यांनी केली.