अखेर बीड मधील तुतारीचा उमेदवार ठरला !
संदीप क्षीरसागर यांना मिळाला एबी फॉर्म, एकनिष्ठेला फळ मिळाले.

आनंद वीर(प्रतिनिधी)बीड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी चांगली रस्सीखच पहावयास मिळाली. विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी मिळणार की,नाही.अशी चर्चा मतदारसंघात सुरू झाली होती.पण पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निष्ठेला बळ देत आज एबी फॉर्म देऊन आमदार संदीप क्षीरसागर यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले.ही बातमी शहरात धडकताच समर्थकांनी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करत दिवाळी साजरी केल्याचे चित्र दिसून आले. जिल्ह्यात राष्ट्रवादीचे २०१९ मध्ये चार आमदार विजयी झाले. पण पक्षात फूट पडून अजित पवार हे एक गट घेऊन भाजपा महायुतीत सामील झाले. यावेळी जिल्ह्यातील धनंजय मुंडे, प्रकाश सोळंके, बाळासाहेब आजबे या तीन आमदारांनी अजित पवारांचे बोट धरुन सत्तेत सामील झाले. परंतु संदीप क्षीरसागर हे थोरल्या पवारां सोबत एकनिष्ठ राहिले. तर लोकसभेच्या निवडणुकीत पक्षाच्या उमेदबाराला विजयी करण्यासाठी रात्रीचा दिवस करुन विजय खेचून आणला. यामुळे संदीप क्षीरसागर हे पवारांच्या विश्वासास पात्र ठरले. परंतु विधानसभेच्या निवडणुका जाहीर होताच त्यांच्या बाबतीत मतदारसंघात विरोधकांनी नकारात्मक चर्चा सुरू केली. ते विधानसभेचे उमेदवार असूच शकत नाही अशी चर्चा घडवून आणली. तर स्वपक्षातील काहींनी दुसऱ्याच चेहऱ्यांची शिफारस केली. परंतु या सर्व बाबींकडे पक्षश्रेष्ठींनी दुर्लक्ष करीत. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या निष्ठेला न्याय देण्याची भूमिका घेत त्यांनाच बीड विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी निश्चित केली. पण तरीही काहींची नकारात्मक चर्चा घडविण्याचे काम सुरू होते. पण आज गुरुवारी (दि.२४) संदीप क्षीरसागर यांना पक्षाचा एबी फॉर्म दिला. ही बातमी मतदारसंघात धडकताच समर्थकांनी जल्लोष साजरा केला. राष्ट्रवादी भवन, छत्रपती शिवाजी महाराज चौक, बार्शी नाका चौक, बशीरगंज चौक, अण्णाभाऊ साठे चौक सह शहरातील विविध ठिकाणी फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. तर संदीप भैय्या आगे बडोच्या घोषणांनी शहर दणाणून सोडला. अनेक ठिकाणी फटाके फोडल्याने आजच दिवाळी साजरी केल्याचे चित्र दिसून आले.