ताज्या घडामोडी
जरांगे समर्थक कन्फ्युज, ठाम निर्णय कोठलाच नाही
काही मतदासंघांत एकच उमेदवार द्यावा लागेल

काही मतदारसंघांमध्ये एकच उमेदवार देण्यावाचून पर्याय नाही असं विधान मनोज जरांगे यांनी केलं आहे, 29 किंवा 30 तारखेला मतदार संघ आणि उमेदवार ठरवू असंही ते म्हणाले आहेत, त्यामुळे जरांगे समर्थकात थोडा संभ्रम निर्माण झाला आहे.
अंतरवालीत बोलताना जरांगे म्हणाले की, प्रत्येकालाच उभं राहायचं आहे त्यामुळे मी सर्वांना बोलवून घेईन. ज्यांनी ऐकले नाही त्यांच्यावरही नाराज होणार नाही. सर्वांनी 30-40 दिवस कष्ट घेतले तर पाच वर्ष सर्व जनता आनंदी राहील असं भावनिक आवाहन करीत आज ते उमेदवार जाहीर करणार नसल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलंय.