
वीर(प्रतिनिधी) आ. लक्ष्मण पवार हे गेल्या काय महिन्यापासून भाजपमध्ये नाराज झालेले चर्चा होत होत्या, मागील आठवड्यातच त्यांची नाराजगी त्यांनी जाहीर करत बीड चे पालकमंत्री गेवराई मतदार संघासाठी निधी देत नसल्याचा,तसेच गेवराई मध्ये चांगले पोलीस अधिकारी तहसीलदार देत नसल्याचा आरोप करत पालकमंत्र्यावर सडकून टीका केली होती.पक्षश्रेष्ठीवर नाराज असल्याने ते भाजपकडून निवडणूक लढणार नाहीत हे स्पष्ट झाले होते. कार्यकर्त्याच्या व जनतेच्या आग्रहामुळे लक्ष्मण पवार यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला.गेवराई जो पर्यंत पंडितांची जुलूमशाही संपत नाही.तो पर्यंत, मैदान सोडणार नाही.असे स्पष्ट संकेतच त्यांनी दिले. विकास कामाच्या माध्यमातून जनतेसमोर जाणार आहे.माझ्या कार्यकर्त्यांच्या जीवावर अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असून,मागे हटणार नाही. असा दृढ विश्वास आमदार पवार यांनी भुमीका जाहीर केली.गुरूवार ता. २४ रोजी सकाळी अकरा वाजता, आ.लक्ष्मण पवार यांच्या मळ्यात गेवराई मतदारसंघातील कार्यकर्त्यांची बैठक पार पडली.यावेळी, कार्यकत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. आमदार पवार यांनी माघार घेऊ नये,त्यांनी केलेल्या विकास कामांचा मतदारांना विसर पडणार नाही. राजकारण स्वप्न नव्हते., आमदार झालो.दहा वर्षात राजकारण बदलले आहे. असे वाटत असतानाच, पंडितांची दादागिरी संपलेली नाही. त्यामुळे, काही गोष्टी सोडता येत नाहीत.लोकांना, कार्यकर्त्यांना उघड्यावर सोडले तर देव माफ करणार नाही असे बोलताच कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.विरोधक भांडवल करतील,कुठेत उमेदवार? मी, गेलो ही नसेल ग्रामीण भागातील काही ठिकाणी,पण विकास कामात कुठेही कमी पडलो नाही. मते पडलीत म्हणून, त्या गावात विकास केला नाही. असा विचार मी केला नाही. उलट त्या गावांना निधी दिला आहे. दोन महिन्यांपासून पायाला जखम झाली आहे. ती अजून ही बरी झाली नाही. डॉक्टरांनी बोलावले आहे. फार दगदग होणार नाही. तरीही, राहीलेल्या दिवसात, मी स्वतःदिडशे गावात जाईल.पण,तुम्ही सर्वजण उमेदवार आहात, असे समजून प्रचार करायला हवा. जो पर्यंत पंडितांची जुलूमशाही संपत नाही. तो पर्यंत मैदान सोडणार नाही. विकास कामाच्या माध्यमातून जनतेसमोर जाणार आहे.माझ्या कार्यकर्त्यांच्या जीवावर अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असून,मागे हटणार नाही.असा दृढ विश्वास आमदार पवार यांनी व्यक्त केला भुमीका जाहिर करत अपक्ष लढणार असल्याचे सांगितले.