मनोज दादा ठरवतील तेच आमचे धोरण,मनोज दादा जिथे बांधतात तेच आमचे तोरण.प्रा.रमेश पोकळे
मनोज दादांनी आदेश दिल्याने अर्ज भरणार.

आनंद वीर (प्रतिनिधी) बीड विधानसभा निवडणूक येत्या काही दिवसांवर आली असताना मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाची तरुणांना, नेत्यांना अर्ज भरण्याच्या सूचना दिल्या आहे. या इच्छुकांपैकी एक प्रा. रमेश पोकळे हे देखील बीड विधानसभेसाठी अर्ज भरणार आहेत. रमेश पोकळे यांनी सामाजिक चळवळीमध्ये काम केले असल्याने ते बहुचर्चित आहेत. कै. अण्णासाहेब पाटील यांना प्रेरणास्थान म्हणून 1994 साली बीड येथे मराठा विद्यार्थी महासंघ ची स्थापना केली होती. तेव्हापासून ते आजपर्यंत मराठा समाजासाठी विविध आंदोलन, मोर्चेत सक्रिय सहभाग नोंदवला होता.2008 साली मुंडे साहेबांनी भाजप पक्षामध्ये येण्यासाठी आग्रह धरला होता, प्रवेशापासून मी भाजप पक्ष वाढवले, पक्ष संघटन वाढवले व ताकतीने भाजपचे काम करून विविध निवडणूक मध्ये यश प्राप्त करून दिले. जबूतवर बसायला कार्यकर्ते नव्हते तिथे त्या ठिकाणी कार्यकर्त्याची जाळे तयार केले. परभणी येथे मेळाव्यात स्व. गोपीनाथराव मुंडे यांनी भर सभेत बोलले की, मला खासदार करण्यात रमेश पोकळे यांचा सिंहाचा वाटा आहे. व रमेश पोकळेला मी आमदार करणार परंतु दुर्दैवाने मुंडे साहेबांचे निधन झाल्यापासून त्यांच्या वारसाने मुंडे साहेबांचा वसा व्यवस्थित चालवला नाही. मुंडे साहेबांनी जी माणसे जोडली होती, जवळ केली होती तीच माणसं मुंडे साहेबांच्या वारसा च्या मी पणाच्या स्वभावामुळे दुरावली गेली, त्यामुळे एकेकाळी बीड जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार देणारा जिल्ह्याचा गड मी पण याच्या स्वभावामुळे आज ढासळत चालला आहे. त्यामुळे भाजपचे नुकसान होत असून पंकजा मुंडे यांना आत्मचिंतनाची गरज आहे. बीड विधानसभेसाठी रमेश पोकळे एक अभ्यासू, संयमी, अनुभवी राजकारणी असून रमेश पोकळे हे बीड विधानसभेसाठी अर्ज करणार असून मनोज दादा जरांगे पाटील हे नक्कीच साथ देतील असा विश्वास रमेश पोकळे यांनी बोलून दाखवला.