
बीड दि. २४ (प्रतिनिधी) :- माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा आज शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.गेल्या ८ दिवसांपासून जयदत्त क्षीरसागर हे मुंबईत तळ ठोकून आहेत. ते एकनाथ शिंदेयांच्या शिवसेनेच्या आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या संपर्कात होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांताध्यक्ष जयंत पाटील यांच्या माध्यमातून जयदत्तअण्णांचा राष्ट्रवादीत प्रवेश होत असल्याचे बोलले जात आहे. जयदत्तअण्णांचा प्रवेश झाल्यानंतर विद्यमान आ. संदीप क्षीरसागरांच्या अडचणीत आणखीच वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.जयदत्त क्षीरसागर हे बीड विधानसभेची निवडणूक लढविणार आहेत.गेल्या तीन-चार महिन्यांपासून त्यांनी मतदार संघात भेटी, दौरे केले असून जनसंपर्क वाढविला आहे. निवडणूक लढविण्यासाठी त्यांची यंत्रणा देखील सज्ज आहे. शरद पवार यांचे कट्टर समर्थक व एकनिष्ठ म्हणून संदीप क्षीरसागर यांची ओळख आहे, शरद पवारांना बरेच आमदार,नेतेसोडून गेल्यानंतर क्षीरसागर पाठीशी खंबीरपणे उभे राहिले त्यामुळे त्यांच्या एकनिष्ठ तिला फळ मिळते का? असा प्रश्र्न पडला आहे. माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी कोणत्याही परिस्थितीत बीड विधानसभा लढवायची असा निर्धार त्यांच्या समर्थकांनी केलेला आहे.त्यामुळे आज शरचंद्र पवार गटात क्षीरसागर यांचा प्रवेश होणार आहे. त्यामुळे बीडची विधानसभेचे उमेदवारी कोणाला मिळते याकडे बीड जिल्ह्यासह सर्वांचे लक्ष लागले आहे.