फारुख पटेल यांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा,पटेल विधानसभेच्या मैदानात !
उमेदवारीचा मार्ग मोकळा,फारुख पटेल समर्थकात आनंदोउत्सव

आनंद वीर(प्रतिनिधी) विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून उमेदवारीचे प्रबळ दावेदार असलल फारुख पटेल यांना त्यांच्यावर दाखल असलेल्या खटल्यामुळे विधानसभा निवडणूक लढविता येणार नाही असे कालच समोर आले होते. यानंतर पटेल यांनी सर्वोच्च न्यायालयात अपील केल्यानंतर न्यायालयात सुरू असलेल्याफारुख पटेल यांच्याविरुद्ध न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यास तूर्तास स्थगिती मिळाल्याने त्यांचे समर्थक, सहकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचा एकच जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी फारुख पटेल यांनी आपला न्यायालयावर पूर्ण विश्वास असून आपल्यावर अन्याय होणार नाही असे म्हटले.न्यायप्रविष्ठ खटल्यास स्थगिती मिळाल्याने ते आता निवडणूक लढवू शकतात अशी माहिती स्वतः फारुख पटेल यांनी दिली आहे. या खटल्याची पार्श्वभूमी थोडक्यात अशी की, काही वर्षापूर्वी वन विभाग आणि बीड नगर परिषद च्या व्यावसायिक गाळ्यांवरून झालेल्या वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या फारुख पटेल यांच्या विरोधात काही राजकारण्यांनी त्यांच्याविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला होता. भारतीय दंड विधान कलम ३५३ अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या या प्रकरणात २०२१ साली त्यांना उच्च न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा सुनावली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने त्यांना या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत निवडणूक लढविता येणार नाही असे काल समोर आले होते परंतु न्यायालयाच्या या निर्णयावर फारूक पटेल यांनी तात्काळ सर्वोच्च न्यायालयात अपील केल्याने त्यांची अपील मंजूर करण्यात आली असून या न्यायप्रविष्ट असलेल्या प्रकरणाला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे फारूख पटेल यांचा निवडणूक लढविण्याचा मार्ग आता मोकळा झाला असल्याची माहिती स्वतः फारूख पटेल यांनी दिली आहे.