बीड शहर पोलिसांनी पाच लाखाची रोकड केली जप्त !
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात नाकाबंदी.

आनंद वीर(प्रतिनिधी)बीड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्या टीमने ५ लाखांची रोकड ताब्यात घेतली आहे. विधानसभा निवडणुक तारखा जाहीर झाल्या असल्याने, निवडणूक विभागाकडून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे या अनुषंगाने दिनांक 25 ऑक्टोबर रोजी शुक्रवार दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास शहर पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान अनंत कैलास दहिवाळ या व्यापाऱ्कडे पाच लाखाची रोकड सापडल्याने रक्कम जप्त करण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मोठया प्रमाणावर पैशांचा काळबाजार सुरु असतो. त्यामुळे पोलीस अधिक्षक अविनाश बारगळ यांनी जिल्ह्यात अनेक ठिकाणी चेक पोस्ट लावले आहेत. याशिवाय शहरात ठिकठिकाणी वाहनाच्या झाडाझडती सुरु असून शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाकडून ५ लाखांची रोकड पोलिसांनी ताब्यात घेतली. यासंदर्भात तात्काळ ही माहिती FST पथकास ही माहिती कळवण्यात आली.सदर इसम सोन्याचा व्यापारी असल्याचे आहे. ची कारवाई बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, पोलीस उपाधीक्षक विश्वंभर गोल्डे, शहर पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सह.पो.नी. बाबा राठोड,पो.उप. रियाज शेख,पो.ना. जयसिंग वायकर,पो.अं. मनोज परजणे, अश्फाक सय्यद यांनी केली.