ताज्या घडामोडी

सस्पेन्स ! तिन्ही क्षीरसागर वेटिंगवरच.

शरद पवार गटात माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा आज प्रवेश ?

आनंद वीर (प्रतिनिधी): विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होऊन दोन दिवस होऊन गेले तरी अद्याप बीड जिल्ह्यातील अनेक मतदार संघातील प्रमुख राजकीय पक्षांचे उमेदवार जाहीर झालेले नाहीत.सर्वाधिक चर्चेचा विषय असलेल्या बीड विधानसभा मतदार संघात माजी मंत्री जयदत्तअण्णा क्षीरसागर यांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील प्रवेश अद्याप वेटींगवरच आहे.शरद पवार आणि जयदत्तअण्णा यांच्यात चर्चा झाली, मात्र उमेदवारीचा विषय अडचणीचा ठरत असल्याचे बोलले जाते. जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रवेशाला खा.बजरंग सोनवणे यांनी विरोध केल्याचे समजते.त्यामुळे शरद पवार यांनी अद्याप जयदत्तअण्णांना हिरवा कंदील दाखविला नाही, त्यामुळे बीडचा पेच अजुनही सुटलेला नाही. दुसरीकडे पंकजाताई यांचे निकटवर्तीय भाजपमध्ये असलेले रमेश आडसकर यांनी पवारांच्या तंबूत जात तुतारी हाती घेतली आहे. आडसकरांचा काल पवारांच्या उपस्थितीत प्रवेश झाला. मात्र माजलगाव विधानसभा मतदार संघाच्या उमेदवारीची घोषणा शरद पवारांनी अद्याप केलेली नाही.तसेच राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून डॉ.योगेश क्षीरसागर यांचे नाव फायनल करावे म्हणून पालकमंत्री धनंजय मुंडे,मंत्री पंकजा मुंडे यांनी नाव सुचवले आहे असे बोलले जात आहे,परंतु योगेश क्षीरसागर यांच्याही नाववर शिक्का मोर्तब झाले नसल्याने तीनही क्षीरसागर वेटींगवरच आहेत.बीड विधानसभा मतदार संघातून महायुतीकडून तिकीट मिळेल यासाठी डॉ. योगेश क्षीरसागर हे जोर लावत आहेत. तर आपण पवारांचे निष्ठावंत आहोत म्हणून संदीप क्षीरसागर हे मुंबईत आहेत.त्यांना तुतारीची उमेदवारी मिळेल असा विश्वास आहे.तर जयदत्त क्षीरसागर हे पवारांच्याच राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळविण्यासाठी मुंबईत तळ ठोकून बसलेले आहेत.मात्र तीनही क्षीरसागरांना अद्याप वेटींगवरच ठेवण्यात आलेले आहे.कोणत्याही राजकीय पक्षानेयांना उमेदवारी जाहीर केलेली नाही. कदाचित शनिवारी महायुती आणि महाआघाडीचे उमेदवार घोषीत होतील.विधानसभा निवडणुकीचे अर्ज भरायला सुरुवात विधानसभा मतदार संघातील महायुती आणि आ.संदीप क्षीरसागर यांना पहिल्याच यादीत स्थान संदीपभैय्यांच्या उमेदवार नाव जाहीर झाल्याचे बोलले जात होते परंतु अधिकृत घोषणा झाली नसल्याचे समजते.मागील काही दिवसात शरद पवार आकडील राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग होत असल्याचे दिसत आहे त्यातच बीड मधील शिवसंग्रामच्या प्रमुख ज्योतीताई मेटे, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला.तर काल पंकजा मुंडे यांचे समर्थक रमेश आडसकर यांनी देखील प्रवेश केला,परंतु माजी मंत्री क्षीरसागर हे बाकी काही दिवसापासून शरद पवारांच्या संपर्कात आहेत परंतु त्यांच प्रवेश अद्याप झाला नाही. प्रवेशासाठी व उमेदवारीसाठी जयदत्त क्षीरसागर मुंबई ठाण मांडून बसले आहे.त्यामुळे बीडच्या विधानसभा उमेदवार बाबत आणखीही कोणताही निर्णय झाला नसल्याने तिन्ही क्षीरसागर वेटिंग वरच आहेत.

 

 

संपादक- गंमत भंडारी | का.संपादक- आर.डी. जोशी

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button