
आनंद वीर (प्रतिनिधी) बीड शहरात कमरेला गावठी पिस्टल लावुन फिरणाऱ्या इसमास स्था.गु.शा.ने केले जेरबंद एक गावठी गट्टा व दोन जिवंत काडतुस जप्त केले. बीड पोलीस अधीक्षक यांनी अवैध धंद्याविरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यावरुन पोलीस निरीक्षक उस्मान शेख स्था.गु.शा. बीड यांनी अवैध अग्निशस्त्र बाळगणारे इसमांची माहिती काढण्यासाठी अधिपत्याखालील अधिकारी यांना सुचना दिल्या आहेत. त्यावरुन स्था.गु.शा. पथक बीड शहरात पेट्रालिंग करीत असतांना पोलीस हवालदार मनोज वाघ यांना गुप्त बातमी मिळाली की, इसम नामे महादेव राज दोडके रा. सावतामाळी चौक याचेकडे पिस्टल असल्याची खात्री लायक बातमी मिळाली, तेव्हा उस्मान शेख पो.नि.स्थागुशा बीड यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले तेव्हा स्थागुशा पथक तात्काळ रवाना होवुन सदर इसमाचा शोध घेण्यात सुरवात केली असता सदर इसम सावता माळी चौक येथे एक इसम मिळुन आला त्याचे नाव महादेव राजु दोडके वय 40 वर्षे रा.सावतामाळी चौक, बीड असे सांगितले त्याचे झडती घेतली असता त्याचे ताब्यात एक गावठी बनावटीची पिस्टल व दोन जिवंत काडतुस असा 42,000/- रु चा मुद्देमाल मिळुन आला आहे. सदर आरोपी विरुध्द पोह मनोज वाघ यांनी सरकार तर्फे दिलेल्या फिर्याद वरुन पो.स्टे. बीड शहर येथे भारतीय शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हयांची नोंद करण्यात आली आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ पोलीस अधीक्षक बीड, अप्पर पोलीस अधीक्षक पांडकर, उस्मान शेख स्था.गु.शा.बीड यांचे मार्गदर्शनाखाली स. फौ. तुळशिराम जगताप,स्था.गु.शा. बीड यांचे मार्गदर्शनाखाली स. फौ. तुळशिराम जगताप, पो.ह. कैलास ठोंबरे, मनोज वाघ, भागवत शेलार, राहुल शिंदे, विकास वाघमारे, नारायण कोरडे, अश्विनकुमार सुरवसे यांनी केली आहे.