एकनिष्ठतेला फळ ! संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी जाहीर.
जयदत्त क्षीरसागर चा आणखी निर्णय नाही,कार्यकर्ते संभ्रमात.

आनंद वीर(प्रतिनिधी)बीड विधानसभा उमेदवारी बाबत सस्पेन्सवर आज संपला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करतानाच बीडचां उमेदवार संदीप क्षीरसागर यांच्या एकनिष्ठतेचे फळ म्हणून बीडची उमेदवारी जाहीर केली.शरदचंद्र पवार गटात राजेंद्र मस्के, शिवसंग्रामच्या ज्योतीताई मेटे यांनी प्रवेश केल्याने बीडच्या उमेदवारी बाबतअनेक तर्क वितर्क लढवले जात होते.त्यातच जयदत्त क्षीरसागर हे शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार असल्याने आणखीच पेच निर्माण झाला होता.परंतु एकनिष्ठतेला फळ देत बीड विधानसभा मतदार संघात उमेदवाराच्या नावाचा सस्पेन्स कायम ठेवत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा बीडचा बालेकिल्ला मजबूत कसा होईल यासाठी प्रयत्न केले. डॉ. ज्योती मेटे यांना पक्षप्रवेश देऊन जातीय समीकरणे जुळवण्याच काम केलं. याबरोबरच राजेंद्र मस्के यांना सोबत घेत बीडच्या बालेकिल्ल्याची तटबंदी मजबूत केली. त्यानंतर आज शनिवारी दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये संदीप क्षीरसागर बीड मधून फायनल झाले आहे. जयंत पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेमधून २२ नावांची घोषणा केली. दोन दिवसापूर्वीच राष्ट्रवादी भवन मध्ये फटाके फोडून रॅली काढून संदीप क्षीरसागरच्या समर्थकांनी आनंद,जल्लोष व्यक्त केला होता.परंतु उमेदवारी बाबद दोन संभ्रम कायम होता,आज दुपारी संदीप क्षीरसागर यांच्या नाव फायनल झाले त्यामुळे एकनिष्ठतेला फळ मिळाले अशी भावना बीड शहरवासी यांनी व्यक्त केली.