
बीड (प्रतिनिधी) गेवराई आणि आष्टी विधानसभा मतदार संघावरून गेल्या काही दिवसांपासून महायुतीत ओढाताण सुरू होती. जागेची आदलाबदल करावी अशी आग्रही मागणी देखील समोर येत होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमरसिंह पंडित यांनी गेवराई विधानसभा मतदार संघातून बंधु विजयसिंह पंडित यांची घडी बसवण्यात यश मिळवलेआहे. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आज ४ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये गेवराई विधानसभा मतदार संघातून विजयसिंह पंडित यांना उमेदवारी जाहीर केल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केली आहे. विजय पंडित यांनी अपक्ष लढण्याची तयारी दर्शवली होती, परंतु आज विजयसिंह पंडितांना अधिकृत उमेदवारी जाहीर होताच समर्थक, कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.