ताज्या घडामोडी
रमेश आडसकर हाबाडा देण्याच्या तयारीत,उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार !
रमेश आडसकर हाबाडा देणार !

आनंद वीर(प्रतिनिधी)बीड विधानसभा उमेदवारी बाबत महाविकास आघाडीच्या बीड जिल्ह्यातील सर्व उमेदवार आज जाहीर झाले असून, माजलगाव मतदार संघामध्ये शेवटच्या क्षणी ट्विस्ट पाहायला मिळाले. राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटात रमेश आडसकर यांनी प्रवेश केल्याने त्यांना उमेदवारी मिळण्याचे संकेत दिले होते. परंतु आज अचानक माजलगाव मतदारसंघात रमेश आडसकर यांना डावलून मोहन जगताप यांची उमेदवारी राष्ट्रवादी चे शरदचंद्र पवार जाहीर केली.त्यामुळे आडसकर नाराज झाल्याने उद्या अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने शरदचंद्र पवार गटासाठी धोक्याची घंटा असल्याचे समजले जाते. उमेदवार बाबत अर्ज दाखल करत असल्याने पवार गटात खळबळ उडाली आहे. रमेश आडसकर कोणाला हाबाडा देणार याकडे बीड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.