संदीप क्षीरसागर यानी घेतली जरांगे यांची भेट !
"मनोज जरांगे यांना मी रात्री नाही दिवसा भेटतो".संदीप क्षीरसागर

आनंद वीर(प्रतिनिधी) आ.संदीप क्षीरसागर यांना शरचंद्र पवार राष्ट्रवादीने बीडची उमेदवारी जाहीर केली.आज संदीप क्षीरसागर यांनी अंतरवली सराटी येथे जावून मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. संदीप क्षीरसागर यांनी पक्षाला दाखवलेल्या एकनिक्षेचे फळ आ.संदीप क्षीरसागर यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली. बीड मतदारसंघातून परत एकदा महाविकास आघाडीकडून संदीप क्षीरसागर यांना संधी देण्यात आली आहे. पक्षाची उमेदवारी जाहीर होताचा बीड शहरात कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी फाटक्याचे आतिशवादी करत रॅली काढून आनंद उत्सव साजरा केला.यासह सकाळी शहरातील राष्ट्रवादी भवन याठिकाणी सुद्धा संदीप क्षीरसागर यांनी बैठक घेऊन प्रचाराची सुरुवात केली आहे. या निवडणूकीत आता संदीप श्रीरसागरांना किती प्रतिसाद मिळतो हे निकालानंतर समजेल. मात्र अंतरवली सराटी येथे प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले की “मी रात्री भेटत नाही दिवसा येतो”या आधी देखील जरांगे पाटील यांची भेट घेतल्याचे सांगत मराठा आरक्षणाविषयी मी भूमिका स्पष्ट केली होती व सभागृहात देखील मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी केली होती, मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेशी व विचाराशी मी सहमत असल्याचे संदीप क्षीरसागर यांनी सांगितले.