ताज्या घडामोडी

प्रा.सुरेश नवले जरांगे पाटलांचा पाठिंबा घेऊन अपक्ष लढणार !

नवलेच्या उमेदवारीने निवडणूक रंगतदार होणार.

आनंद वीर(प्रतिनिधी) अत्यंत अभ्यासू आणि जनतेचे प्रश्न सोडवणारा लोकप्रतिनिधी म्हणून माजी मंत्री सुरेश नवले यांची ओळख आहे. मागील मंत्रीपदाच्या काळात त्यांनी जिल्ह्यात विकासाच्या अनेक योजना राबवल्या.त्यांच्या कार्यकाळात अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा प्रा. सुरेश नवले निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने त्यांच्या समर्थकांसह मतदार संघातील जनतेत समाधान व्यक्त केले जात आहे.ते अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. प्रा. सुरेश नवले हे 1995 मध्ये राज्याच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून कार्यरत राहिलेले आहेत. त्यांच्या उमेदवारीमुळे निर्माण बीड विधानसभेची निवडणूक आता रंगतदार होणार आहेबीडमधून माजी मंत्री प्रा. सुरेश नवले हे संघर्ष योद्धा मनोज जरागे पाटील याचा पाठिंबा घेऊन बीड विधानसभा मतदारसंघात अपक्ष लढवणार आहेत.संघर्ष योद्धा मनोज जरागे पाटील याचा पाठिंबा घेऊन माजी मंत्री प्रा. सुरेश नवले हे अपक्ष म्हणून आज 28\10\2024 सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. प्रा.नवले यांच्या उमेदवारीमुळे बीड विधानसभा निवडणूक रंगतदार होणार असल्याची चर्चा राजकीय जाणकारातून व्यक्त केली जात आहे.

संपादक- गंमत भंडारी | का.संपादक- आर.डी. जोशी

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button