
आनंद वीर(प्रतिनिधी) बीड विधानसभा उमेदवारी राष्ट्रवादी अजित पवार गटाने डॉ. योगेश क्षीरसागर याना उमेदवारी बाबत अद्यापही नाव जाहीर न केल्याने योगेश क्षीरसागर आज दुपारी समर्थकांचा संवाद मेळावा घेऊन कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. तुम्ही पक्ष, चिन्हाचा विचार करु नका पक्त खंबीर साथ द्या म्हणत रणशिंग फुंकले आहे. संवाद मेळाव्याच्या ठिकाणाहून सरळ अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाल्याने बीड विधानसभेत तीन क्षीरसागर निवडणूक लढविणार असे चित्र दिसत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एक दिवस शिल्लक असतानाही महायुतीचा बीड विधानसभा मतदारसंघ कोणाला याचा निर्णय होत नसल्याने इच्छूक उमेदवार शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर राष्ट्रवादी कडून इच्छुक उमेदवार योगेश क्षीरसागर यांनीही समर्थकांचा संवाद मेळावा घेतला यावेळी समर्थकांनी निवडणूक लढविण्याची मागणी केली यांचं मान राखत योगेश क्षीरसागर यांनी बोलताना वडील आजारी आहेत. कुटुंब सोबत नाही तुम्हीच आधार आहात, तुम्ही खंबीर साथ द्या मी माघार घेणार नाही. ही लढाई मुंबईला जाण्यासाठी आहे. लढायचे असेल तर पक्ष चिन्हाचा विचार करु नका, मुंबईत खूप मोठ्या हालचाली सुरू आहेत. काहीही होऊ शकत म्हणत उमेदवारीचे संकेत दिले. तसेच अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करुन जिंकून मुंबईला जायचं आहे. हे आपली कामे करण्यासाठी, समस्या सोडविण्यासाठी जायचं असल्याचं सांगितलं. तसेच ३५ वर्ष वडीलांनी बीडची सेवा केली आता मला सेवेची संधी द्यावी असे आवाहन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. येथून हजारो समर्थकांसह डॉ. योगेश क्षीरसागर अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी रवाना झाले. यामुळे आता बीड विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात तिन्ही क्षीरसागर उतरणार असे चिन्ह दिसत आहे.