ताज्या घडामोडी

ट्रॅक्टर चोरणारी टोळी गजाआड ! ट्रॅक्टर जप्त.

बीड स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी.

 

आनंद वीर(प्रतिनिधी)बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी वाहन चोरीचे जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला सूचना दिलेल्या आहे. त्यावरून पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा.बीड यांनी वाहन चोरी करणारे आरोपींची माहिती काढुन गुन्हे उघडकीस आणण्यासाठी अधिपत्याखालील अधिकारी यांना योग्य मार्गदर्शन करून आदेश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने दिनांक 27/10/2024 रोजी पो.स्टे.माजलगाव ग्रामीण गुरनं 227/2024 कलम 303(2) BNS मधील ट्रॅक्टर चोरीचा स्थानिक गुन्हे शाखा,बीड समांतर तपास करीत असतांना स्थागुशा येथील पोलीस हवालदार जफर पठाण यांना ट्रॅक्ट चोरी केलेल्या आरोपीची गोपनिय माहिती मिळाली की, इमस नामे रोहन अभंग हा अंमलवाडी येथे फाटा येथे ट्रॅक्टर घेवुन आल्याची माहिती मिळाली तेव्हा पोलीस निरीक्षक श्री. उस्मान शेख यांनी पुढील कारवाई करण्यासाठी ग्रे.पोउपनि श्री. हनुमान खेडकर यांचे पथकास पाचारण केले. स्था.गु.शा.पथकाने अंबलवाडी फाटा ता.परळी वै. येथे सापळा रचुन अंमलवाडी फाटा ता.परळी वै. येथे उभा असलेल्या टॅ्रक्ट वरील संशयीत दोन इसमांना ताब्यात घेतले त्यांची नावे 1) हनुमंत सिताराम वय 28 रा.अंबलवाडी ता.परळी वै. 2) रोहन अनिल अभंग वय 28 रा. संगमनेर ता.अहिल्यानगर(अहमदनगर) असे सांगितले तेव्हा त्यांना ट्रॅक्टर बाबत बारकाईने चौकशी केली असता त्यांनी सदर टॅक्टर पवारवाडी शिवार माजलगाव येथुन त्यांच्या इतर दोन साथीदारांसह मिळुन ट्रॅक्टर चोरी केल्याचे सांगितले.निष्पन्न आरोपीचे ताब्यातुन वर नमुद गुन्हयातील एक गुन्हयात गेलामाल स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर रोटरसह कि.अं.3,00,000/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळुन आलेले दोन आरोपी व जप्त ट्रॅक्टर पो.स्टे.माजलगाव ग्रामीणचे ताब्यात देण्यात आला असुन पुढील तपास पो.स्टे.माजलगाव ग्रामीण करीत आहेत. इतर दोन निष्पन्न आरोपींचा शोध स्थागुशा व पो.स्टे.घेत आहेत. ही कामगिरी अविनाश बारगळ पोलीस अधीक्षक,बीड, सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक बीड,उस्मान शेख पोलीस निरीक्षक स्था.गु.शा.बीड यांचे मार्गदर्शनाखाली ग्रेपोउपनि. हनुमान खेडकर, पो.ह./ जफर पठाण, महेश जोगदंड, देविदास जमदाडे, तुषार गायकवाड, पो.अं./बप्पासाहेब घोडके, अश्विनकुमार सुरवसे, चालक गणेश मराडे यांनी केली आहे.

संपादक- गंमत भंडारी | का.संपादक- आर.डी. जोशी

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button