ताज्या घडामोडी
ज्योतीताई मेटे विधानसभेच्या मैदानात !
कार्यकर्त्याच्या व जनतेच्या आग्रहास्तव निवडणूक लढवणारच.

आनंद वीर (प्रतिनिधी) बीड विधानसभा निवडणुकीत शिवसंग्रामच्या ज्योतीताई मेटे यांनी उमेदवारी अर्ज भरून विधानसभेच्या मैदानात उतरल्या आहेत. मागील आठवड्यात शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश केल्यानंतर बीड विधानसभेची उमेदवारी मिळणार असल्याचे चर्चा होती. परंतु विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांचा एकनिष्ठतेचा विचार करून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने पुन्हा बीड साठी संदीप क्षीरसागर यांना उमेदवारी दिल्याने ज्योतीताई मेटे यांनी आज दिनांक 29 ऑक्टोबर रोजी शिवसंग्राम भवन पासून ते तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढून, शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केला असून, विधानसभेच्या मैदानात असल्याचे स्पष्ट संकेत दिले.