दोन हजाराची लाच घेताना तलाठी एसीबीच्या जाळ्यात !
तलाठी बाळासाहेब वनवेला लाच घेताना रंगेहात पकडले.

आनंद वीर(प्रतिनिधी) बीड जिल्ह्यामध्ये लाचखोरीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत आहे. बरेच शासकीय कार्यालयामध्ये पैसे दिल्याशिवाय कर्मचारी अधिकारी कामच करत नसल्याचे दिसत आहे. मागील आठवड्यात एकाच दिवशी बीड एसीबीने चार लाचखोर पकडले होते.त्यानंतर आज 29 नोव्हेंबर मंगळवार रोजी धनत्रयोदशीला बीडमध्ये एसीबीने फटाका फोडला आहे. त्यामुळे लाचखोराने लाजा सोडल्या आहेत असेच म्हणावे लागेल.दोन हजाराची लाच घेताना एका तलाठ्यास रंगेहाथ बीड एसीबीच्या टीमकडून लाचखोर तलाठ्याच्या घराची झडती घेण्यात आली.बीड तालुक्यातील तळेगाव येथील तलाठी बाळासाहेब वनवे यांना दोन हजार रुपयांची लाच घेताना बीड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मागील आठवड्यामध्ये एकाच दिवशी चार लाचखोर पकडल्यानंतर एसीबीने पुन्हा एका लाचखोराला पकडले आहे. मागील काही महिन्यात लाचखोरावर कारवाई होण्याच्या प्रमाणत वाढ झाली असून बरेच लाचखोराना लाचलूचपत कार्यालय अधीक्षक शिंदे व टीमने लाच घेताना रंगेहात पकडून कारवाई आहे.