
आनंद वीर( प्रतिनिधी) बीड विधानसभा निवडणुकीत सर्वच पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज केले असून पक्षाने उमेदवारी न दिलेल्या उमेदवारांनी अपक्ष अर्ज केले आहेत. भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक लोढा यांनी देखील विधानसभेचा अपक्ष अर्ज दाखल केला आहे. बीड लोकसभेमध्ये काही फरकाने भाजपचे उमेदवार पराभूत झाल्याने या मतदारसंघात भाजपची वर्चस्व आहे, यापूर्वी सहापैकी पाच जागेवर भाजपचे उमेदवार विजय झाले होते. त्यामुळे या विधानसभेवर समीकरणे जुळत असल्याने भाजपचाच हक्क आहे त्यामुळे अशोक लोढा यांना उमेदवारी देणे यावी अशी मागणी भाजप वरिष्ठ नेत्याकडे केली होती. अशोक लोढा यांनी चौसाळा सर्कल मध्ये जिल्हा परिषद सदस्य असताना घरकुल,कृषी योजना,रस्ते नाली, वीज सह इतर प्रश्न मार्गी लावले. तसेच करुणा सारख्या महाभयंकर काळात नागरिकांना रुग्ण सेवा देत, 100 घाटांचे महाराष्ट्रातील पहिले कोरोना सेंटर उभारले होते. त्यामुळे रुग्णांची मनोबल वाढवण्याचे काम भीती करण्याचे काम केले. तसेच प्रियदर्शनी नागरी बँक च्या माध्यमातून शेतकऱ्यांना महिलांना नागरिकांना सुलभ दरांमध्ये कर्ज कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देत शेतकऱ्यांना मदत केली. बीड शहरात उद्योगधंदे नसल्याने प्रमाणात वाढ झाली आहे, बरेच वर्षापासून रेल्वे नसल्याने उद्योगधंद्याला चालना मिळत नाही व नवीन उद्योग उभारी येत नाही त्यामुळे येत्या काळात रेल्वे यावी व नवीन उद्योगाला चालना मिळावी यासाठी बीड येथील एमआयडीसी मध्ये नवीन प्रकल्प उभारणी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अशोक लोढा यांनी सांगितले. बीड जिल्ह्यातील 25% मतदार हा बीड जिल्ह्या बाहेर तसेच महाराष्ट्र इतर राज्यात असल्याने लोकप्रतिनिधींनी याची दखल घेऊन नागरिकांना जिल्ह्यातच रोजगार उपलब्ध करून देण्याचे बोलून दाखवले. त्यामुळे अशोक लोढा हे एक अभ्यासू, संयमी व अनुभवी राजकारणी असल्याने त्यांनी बीड विधानसभेसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.