ताज्या घडामोडी

बीड जवळ बनावट ऑइलच्या कारखान्यावर धाड !

बाळराजे दराडे यांची सिंघम कारवाई.सहा लाखाचा मुद्देमाल जप्त.

आनंद वीर (प्रतिनिधी)बीड शहरपासून जवळ असणाऱ्या काकडहिरा शिवारात मागच्या वर्षभरापासून नामांकित कंपनीचे बनावट ऑईल तयार करण्याचा गोरखधंदा सुरु होता. याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे यांना मिळाल्यानंतर त्यांनी या ठिकाणी छापा मारला असता जवळपास ५ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी दोघा जणांवर बीडच्या ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून बीडजवळ बनावट ऑईलचे सुरु असलेले रॅकेट उद्धवस्त झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.बीड जिल्ह्यात अवैध धंद्यावर कारवाईसाठी एसपींने आदेश दिले आहेत. तसेच बाळराजे दराडे यांच्यावर जिल्ह्यात कुठेही अवैध धंदे असल्यास थेट कारवाई करण्यासाठी विशेष पथकाचे अधिकार त्यांनादेण्यात आले. त्यामुळे बीड शहराजवळ असणाऱ्या काकडहिरा शिवारातील जिओ पेट्रोल पंपाच्या पाठीमागील बाजूस बनावट ऑईलची विक्री सुरु असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी दुपारी ४ च्या दरम्यान त्यांनी बनावट ऑईल तयार करणाऱ्या ठिकाणी छापा मारला. यावेळी पोलिसांना टाटा मोटर्स, भारतबेंझ, गल्फचे बनावट रित्या तयार केलेले ऑईल आढळून आले. विशेष म्हणजे हे ऑईल तयार करण्यासाठी विविध मशीनरी, मोटर्ससह ३०० पोते युरिया घटनास्थळी दराडे यांना मिळून आला आहे. पोलिसांच्या या कारवाईत ५ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या कारवाईमुळे मात्र अवैध धंद्यावाल्यांमध्ये मोठी खळबळ उडाली. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे, एपीआय, राठोड, मोराळे, मुंडे, जायभाये, अलगट, राऊत, सानप, बडे, निर्धार यांचा समावेश होता.

 

 

संपादक- गंमत भंडारी | का.संपादक- आर.डी. जोशी

बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क 8623880100

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button