वंचित कडून पुरुषोत्तम वीर विधानसभेच्या मैदानात !
वंचितांचा वाघ देणार सर्वांना टक्कर....

आनंद वीर(प्रतिनिधी)वंचित बहुजन आघाडी कडून आज शेवटच्या दिवशी बीड येथील तरुन,तडफदार युवा नेतृत्व तथा बीड जिल्हा उपाध्यक्ष पुरुषोत्तम उर्फ (गोटू)वीर यांना अधिकृत उमेदवार अर्ज दाखल केला आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर व राज्याच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या आदेशाने आज बीड विधानसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून पुरुषोत्तम उर्फ गोटू वीर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.गत पंचवार्षिक निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारा मुळे विद्यमान मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना मोठा फटका बसला होता. त्या निवडणूक मध्ये ते पराभूत झाले होते. वंचित बहुजन आघाडीचा मतदार हा संपूर्ण बहुजन समाजात व कट्टर आंबेडकरवादी असून त्यामुळे राज्यसह देशाच्या राजकारणात मोठी उलथापाल करण्याची क्षमता वंचित बहुजन आघाडीकडे आहे. वंचित बहुजन आघाडीच्या बीड येथील उमेदवारीने प्रस्थापित उमेदवारांचे धाबे निश्चितपणे दणाणले जाणार आहे. वंचित बहुजन आघाडी ज्या पद्धतीने बीड सह राज्यात राजकारण करत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात येणारी सत्ता ही त्रिशंकू असेल असे सध्या तरी चित्र दिसत आहे. वंचित बहुजन आघाडीला कमी लेखून प्रस्थापित राजकीय पक्षांनी आपल्या पायावर धोंडा मारून घेऊ नये असेच चित्र बीड विधानसभा मतदार संघात निर्माण झाले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना पुरुषोत्तम वीर यांच्यासोबत पक्षाचे नेते डॉ. नितीन सोनवणे, सुरेश पोतदार, युनूस शेख, एड. चंद्रमनी विर, महिला जिल्हाध्यक्ष एड. अनिता चक्रे, कल्पना गोरे, भीमराव पायाळ, सय्यद सुभानभाई, भूषण लोळगे, लखन तोडकर, अनिल वीर, मिलिंद इंनकर, सुशील काकडे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.