ताज्या घडामोडी
महामार्ग पोलिसांच्या वाहनाचा अपघात !
API गजानन जाधव सह,पोलीस निरीक्षक कापुरे,चालक किरकोळ जखमी

आनंद वीर(प्रतिनिधी) महामार्ग पोलीस निरीक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगर याचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे एपीआय गजानन जाधव, म.पो. मांजरसुंबा पथकाच्या वाहनाला काल दि. 29 ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास गेवराई येथून भेट घेऊन परतत असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वर पाचोड, कचनेर जवळ वाहन क्र.MH 23 VK 3617 या वाहनाचे टायर फुटून अपघात झाला.या अपघातात API गजानन जाधव, पोलीस निरीक्षक गेवराई कापुरे व वाहन चालक हे किरकोळ जखमी झाले असून जखमीना औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.