
वीर( प्रतिनिधी)बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ हे बीड शहरातील शहर पोलीस ठाणे जवळ असलेल्या एका भोजनालयामध्ये पायी चालत जाऊन जेवण केले. पोलीस अधीक्षक बारगळ हे शहर पोलीस ठाण्यापासून अचानक पायी जात असताना पोलीस निरीक्षक शितल कुमार बल्लाळ सह कर्मचाऱ्याची धावपळ उडाली. पोलीस अधीक्षक यांनी विकास साध्या भोजनालयात जेवण केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले.दिवाळी हा सण काही दिवसावर आली आल्याने मुख्य बाजारपेठ सुभाष रोड वर कपडे तसेच इतर साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची गर्दी होती. नागरिकांनी रस्त्यावरच दुचाकी चार चाकी लावल्याने वाहतूक कोंडी झाली त्या वाहन धारकांना पोलीस अधीक्षक यांनी आपल्या दुचाकी चार चाकी रस्त्याच्या बाजूला, स्टेडियम जवळील मोकळ्या जागेत लावण्याच्या सूचना दिल्या.यावरून पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ हे कडक व शिस्तप्रिय अधिकारी असल्याचे पुन्हा एकदा पहावयास मिळाले.यावेळी बीड पोलीस अधीक्षक अविनाश बारगल ,अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर सह बीड शहर पोलीस ठाणे निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ होते.