कुंडलिक खांडे तिसऱ्या आघाडीचे उमेदवार !
महाराष्ट्र स्वराज्य पार्टी कडून केला उमेदवारी अर्ज दाखल

आनंद वीर(प्रतिनिधी) शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कुंडलिक हरीभाऊ खांडे यांनी बीड विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्या आघाडीचे उमेदवार रहाणार आहेत. एक अपक्ष आणि एक तिसरी अघाडी असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले होते. दोन्ही अर्ज वैध ठरले असल्याने एक अर्ज ते मागे घेतली. पण कोणता अर्ज परत घेणार याकडे लक्ष लागले आहे. तर ते तिसऱ्या अघाडीचे उमेदवार राहिलेतर जरांगे पाटलांचे समर्थक त्यांना स्वीकारतील का?शिवसेना माजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे हे पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक होते. परंतु काही घडामोडी घडल्याने ते निवडणुकीच्या रिंगणात उतरणार की, नाही. असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली. जरांगे पाटलांची भेट घेतल्याने ते निवडणूक लढणार हे निश्चित मानले गेले. तर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करुन शर्यतीत असल्याचे दाखवून दिले. बीडविधानसभेची उमेदवारी अर्ज दाखल करताना जरांगे पाटलांच्या आदेशावरून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याचे सांगून एक अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. परंतु यासह त्यांनी आणखी एक उमेदवारी अर्ज दाखल केला असून तो अर्ज त्यांनी तिसऱ्या आघाडीचा मित्र पक्ष महाराष्ट्र स्वराज्य पार्टी कडून एक असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. ही बाब उघडकीस आली. तिसऱ्या आघाडी आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ते तिसऱ्या आघाडीचे उमेदवार असणार आहेत.