ताज्या घडामोडी
करुणा शर्मा यांचा अर्ज बाद, धनंजय मुंडे यांचा अर्ज वैध


परळी विधानसभा मतदारसंघात मंत्री धनंजय मुंडे, राजेसाहेब देशमुख व राजेभाऊ फड या 3 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज वैध ठरलेत. तर धनंजय मुंडे यांच्या पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या करुणा शर्मा यांचा अर्ज अवैध ठरला आहे.
या मतदारसंघात धनंजय मुंडे यांनी महायुती, तर राजेसाहेब देशमुख यांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याठिकाणी राजेभाऊ फड यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला आहे.