क्षीरसागर मुक्त बीड करण्यासाठी तिसऱ्या आघाडी कडून अर्ज…कुंडलिक खांडे
लढायचं की पाडायचं हे जरांगे पाटील सांगितलच,दादांचा शब्द अंतिम राहील.

आनंद वीर(प्रतिनिधी) बीड विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी विविध पक्षाचे उमेदवारानी अर्ज केली असून मराठा संघर्ष होता जरांगे पाटील यांच्या आदेशाने बीडमध्ये 17 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. 31 तारखेला जरांगे पाटील हे उमेदवारा बाबद निर्णय घेणार आहेत,बीड विधानसभा कोणी लढवायची आदेश दिला देणार आहेत. बीड विधानसभेसाठी कुंडलिक खांडे यांनी जरांगे पाटील यांच्याकडून अर्ज केला असला तरी त्यांनी तिसऱ्या आघाडीकडून”क्षीरसागर मुक्त बीड”करण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.जरांगे पाटील यांनी जो उमेदवार बीडसाठी देतील त्याचा प्रचार करणार व निवडन आणणार, परंतु जरांगे पाटील यांनी उमेदवार दिला नाही तरच तिसऱ्या आघाडीचा विचार केला जाईल असे सांगितले.माझ्यावर राजकीय देशातून खोटे गुन्हे दाखल करून अडकवण्यात आले. ज्या लोकांनी मला अडकवले जेलमध्ये टाकण्यासाठी प्रयत्न केले त्यांचे देखील आज काय हाल आहेत हे बीडचे जनता पाहत आहे, क्षीरसागर यांनी 35 वर्षे नगरपालिकेमध्ये सत्ता असून देखील शहराचा विकास झाला नाही, त्यांनी फक्त घर फोडायचे, कार्यकर्ते फोडायचे काम केले. आपल्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांना कामाला लावून ते मत मागण्याचे काम करत आहेत. राजकीय पक्षांना देखील क्षीरसागर शिवाय दुसरा कोणी लायकीचा उमेदवार वाटत नाही का?असा सामान्य नागरिकाला प्रश्न पडला आहे. या विधानसभा निवडणुकीमध्ये आता तिन्ही क्षीरसागर हे एकमेकांसवर उभे असून तिनही क्षीरसागराना त्यांची जागा दाखवा व बीड शहर क्षीरसागर मुक्त करा असे आवाहन शिवसेना माजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी केले आहे.