साकेत कंट्रक्शन व अभियंत्याची मनमानी !
नगर रोडवरील रणखांबाची जागा बदलण्याचा प्रयत्न.कारवाई करावी...प्रेम कांबळे

*रणखांब जतन व दुरुस्तीच्या नावाखाली जागा बदलण्याचा घाट असा थेट प्रश्न ऑल इंडिया पँथर्स सेनेचे बीड शहराध्यक्ष प्रेम कांबळे यांनी केला आहे*
आनंद वीर(प्रतिनिधी)बीड अहमदनगर रस्त्याचे काम प्रगतीपथावर सुरू असून या रस्त्यावरती बीड शहरातील नगर रोड वरील चंपावती शाळेच्या समोर अनेक वर्षापासून आहे. शहराची ऐतिहासिक ओळख म्हणून या रणखांबाची ओळख आहे. रणखांब रस्त्यावर येत असल्याने तो उकडून इतर ठिकाणी हलवण्याच्या हालचाली सुरू आहेत पुरातत्त्व विभागाकडे नोंद असलेल्या अशा स्थळांची जागा बदलता येत नाही तरीही रस्त्याचे काम करणारे साकेत कंट्रक्शन आणि अभियंता भोपळे मनमानी कारभार करीत आहेत याची जागा बदलत असल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे असा प्रकार घडत असताना पुरातन विभाग अद्याप झोपेत असल्याचे दिसून येत आहे त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांस विचारना करण्यास गेलो असता त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांनी उडवा-उडवीचे उत्तर देत आमच्याकडे सर्व परमिशन कार्यारंभ आदेश आहेत असे सांगून नकाशे दाखवत आहेत तसेच जो रणखांब चंपावती शाळेच्या बाहेर असून तो रंणखांब त्या ठिकाणाहून उकडून चंपावती शाळेच्या प्रणागनाच्या मैदानात बसवण्याचे काम करत आहेत व मनमानी कारभार सुरू आहे कुठेतरी थांबले पाहिजे व रणखांब हा जमिनीत गाडला जाण्याची शक्यता आहे यामुळे रणखांब चे जतन व दुरुस्तीसाठी 5 लाख 59 हजार 382 रुपये निधीस जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिली आहे यांचे कार्यरंभ आदेश ही निघाले आहे यामुळे याची दुरुस्ती होणार आहे परंतु जागा बदलण्याचे काही कुठे आदेश दिसून आले नाही परंतु या दुरुस्तीच्या नावाखाली हा रणखांब चंपावती शाळेची संरक्षण भिंत तोडून त्याच्या आत बसविण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे याची दुरुस्ती व चांगला उंच ओटा करून याचे जतन केले जावे याला कोणाचा विरोध नाही पण याची जागा बदलली जात आहे याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष घालून हा नेमका काय प्रकार व काय गोंधळ चालू आहे याबाबत खुलासा करावा अशी मागणी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे बीड शहराध्यक्ष प्रेम कांबळे यांनी केलेली आहे.