
वीर( प्रतिनिधी)बीड शहरातील पेठ बीड पोलीस ठाणे हद्दीत सुभाष कॉलनी मध्ये, पेठ बीड पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर डोक्यात चिरा घालून एकाचा खून करण्यात आला. मयताचे नाव चंद्रकांत जाधव असे असून कोणत्या कारणावरून खून व कोणी केला हे अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस घटनास्थळी पोहचले असून पंचनामा करत आहेत.पेठ बीड पोलीस ठाण्या पासून काही अंतरावर खून झाल्याने पोलिसाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून बीड बीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक अवैध धंदे बोकाळले त्याकडे पोलीस प्रशासनाचे अर्थदुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे असून खून करणाऱ्या व्यक्ती तडीपार असल्याची समजते.