ताज्या घडामोडी
लक्ष्मीपूजन च्या मुहूर्तावरच बीड शहरातील बत्तीगुल !
महावितरणवर शहरवासीयांनी केला रोष व्यक्त.

आनंद वीर(प्रतिनिधी) महावितरण चा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला, ऐन दिवाळी,लक्ष्मीपूजन च्या मुहूर्तावरच सायंकाळी सातच्या सुमारास अर्ध बीड शहरतील बत्ती गुल झाल्याने शहरवासीयांनी महावितरणवर रोष व्यक्त केला.त्यामुळे महावितरण ने शहरातील बत्ती गुल करण्यासाठी लक्ष्मीपूजन चा मुहूर्त साधला होता का? असा प्रश्न बीड शहरातील नागरिकांना पडला होता.माळवेस भागातील CT (करंट ट्रान्सफर) फुटल्याचे कारण सांगत लाईट बंद झाल्याचे सांगण्यात येत होते. बत्ती गुल झाल्याने शहर वासायानी अंधारातच दिवाळी साजरी करत लक्ष्मीपूजन केले.बीड शहरातील स्वराज्य नगर, शिवाजीनगर, धानोरा रोड, शाहूनगर, जालना रोड, माळीवेस, कारंजा रोड भाग, धोंडीपुरा,नगर रोड,कॅनॉल रोड,सह इतर भाग दोन तास अंधारात होता.सणासुदी मध्ये तरी महावितरण ने शहरातील बत्तीगुल करू नये अशी मागणी होत आहे.