माजलगावात वाहन तपासणीत दोन लाखाची रक्कम सापडली !
SST पथक प्रमुख साळवे व पोलिसांची कारवाई.

आनंद वीर(प्रतिनिधी)विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू झाली असल्याने सर्वत्र वाहांनाची तपासणी सुरू आहे.माजलगाव येथील SST पथक प्रमुख साळवे व पोलीस कर्मचारी वाहन तपासणी करत असताना माजलगाव येथील केसापुरी कॅम्प,सदोळा चौक येथे दिनाक १/११/२०२४ रोजी एक वाजता सादोळा चौक येथे वाहन क्रमांक.MH 14 LE 9934 ची तपासणी केली असता वाहना मध्ये दोन लाखाची रक्कम सापडली. रक्कम बाबत विचारणा केली असता असताना रघुनाथ शंकर पडघनकर वय-29 वर्षे,व्यवसाय-मुकादम रा.ढोल उमंरी ता.उमंरी जि.नादेड येथील असल्याचे सांगण्यात आले.त्याची चौकशी केली असता सांगण्यात आले की, राहुल निलेश दादाभाऊ पोखरकर रा.मंचर ता.खेड जि.नगर या मालकाकडे मुकादम म्हणुन कामाकाज करतात. पुणे चिंबळी गाव येथे एकुण 15 लेबर असुन सदर ठिकाणी पत्र्याचे शेड तयार करण्याचे काम करतात. मजुराने एक ते दीड महीण्यापासुन केलेल्या कामाचे पैसे 200000/- रुपये निलेश पोखरकर यांनी दिल्याने सदर पैसे हे मजुरास(कोयत्यास) देण्यासाठी दिल्याने पैसे हे मजुराचे नातेवाईका समक्ष त्याचे घरी देण्याचे असल्याने गावाकडे जात असल्याची माहिती दिली.त्यावर त्यांनी सदर पैशाची पाहणी केली व सदर पैशा बाबत चौकशी करण्यासाठी सोबत स्टेशन माजलगाव शहर येथे यावे लागेल असे सांगितले. पोलीस स्टेशन येथे आल्याचे नंतर सदर पैशा बाबत SST पथक प्रमुख साळवे व पोलिसांना सर्व पुरावे दिल्याने पथकातील अधिकारी यांनी योग्य ती कार्यवाही करुन, पैशाबाबत पुरावे दिल्याने चौकशी करून सोडून देण्यात आले.ही कारवाई SST पथक प्रमुख साळवे,जाधव, चव्हाण,भुजबळ,पोलीस कर्मचारी मोरे,पो.ना.खंडागळे,पो.ना.बांगर यांनी केली.