सी.ओ.अंधारेमुळे बीड शहर अंधारात,शहरात घाणीचे साम्राज्य.
जागोजागी कचऱ्याचे ढीग, पावसाळ्यात15 दिवसाला पिण्याचे पाणी

आनंद वीर (प्रतिनिधी) बीड मुख्याधिकारी पदी नीता अंधारे यांची नियुक्ती झाल्यापासून बीड शहराचे वाट लागलेली चित्र दिसत आहे.शहरात नगरपालिका दुर्लक्षने जवळ-जवळ सर्वच भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. हिंदू धर्मातील सर्वात मोठा समजला जाणार सन दिवाळीमध्ये देखीलमुख्य रस्त्यावरील तसेच गल्लो गल्लीतील खांबावरील लाईट बंद असल्याने अंधारे यांनच्या आशीर्वादाने दिवाळी अंधारात साजरी करावी लागली.शहरात मुख्य रस्ता,गल्लो गल्ली,बाजारपेठ,मंडी ,रस्त्याच्या बाजूलाच कचऱ्याचे ढिगच ढीग दिसतात.तर काही भागात कचरा कुंडी फुल्ल होवून त्यावर भटके श्वान व गुरे ताव मारताना दिसतात.या रस्त्यावर नेहमी विध्यार्थी,पालक व स्थानिक वर्दळ नागरिकांनची वर्दळ असते. नगरपालिकेले वेळोवेळी साफसफाई न केल्याने नाल्या तुंबल्या आहेत.कचरा रस्त्यावर येत असून घाण होत आहे,या घाणीमुळे दुर्गंधी येत आहे.रोगास निमंत्रण होत आहे. शहरातील वाढत्या घाणीमुळे सद्या डासाचे प्रमाण वाढत असून डेंग्यू सारखा रोगाचे रुग्णवाढ होत असून त्या सह विविध रोगास निमंत्रण होत आहे.या कचऱ्यामुळे शाळेत येणाऱ्या विध्यार्थी यांना,परिसरात ये जा करणाऱ्या जनतेस त्रास,दुर्गंधी चा सामना करावा लागत आहे. सर्वत्र कचऱ्याचे ढीग दिसून येत आहेत. कचरा कुंडीतील कचरा नगरपालिकाने गावाच्या बाहेर टाकला पाहिजे पण तसे होत नसल्याने कचराकुंडी ठेवावी. रस्त्याच्या बाजूलाच घाण साचत आहे.यामुळे रोगराईला निमंत्रण होत आहे,सध्या डेंगूची साथ असल्यामुळे या भागात धूर फवारणी करावी,नालीत जंतूनाशक फवारणी करावी अशी मागणी नागरिकांतुन होत आहे.नगरपालिका सि.ओ.यांनी पदभार घेतल्यापासून बीड शहराचे पूर्ण वाट लागल्याचे दिसत आहे, त्यामुळे सणासुदीच दिवसात तरी स्वतःलक्ष घालून या स्वच्छता निरीक्षण यांना आदेश देऊन साफसफाई करणारे कर्मचारी वाढ करून शहरातील कचरा ,नाली साफसफाई करुन द्यावी व साथीरोगापासून बीड च्या नागरिकांना वाचवावे.अशी मागणी बीड शहरातील नागरिक करत आहेत.