क्षीरसागर मुक्त बीड होणार ? मतदारात चर्चा.
मूलभूत सुविधा तसेच बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी एकाही क्षीरसागर आणि प्रयत्न केला नाही.

आनंद वीर(प्रतिनिधी)बीड विधानसभा निवडणूकी मध्ये चांगलं ट्विस्ट पाहायला मिळत आहे.बीड मध्ये काका विरोधात दोन पुतणे, तीनही क्षीरसागर एकमेकांच्या विरोधात उभे राहिल्याने निवडणूक रंगतदार होण्याची चित्र दिसत आहे. गेल्या विधानसभा मध्ये काका जयदत्त क्षीरसागर विरोधात पुतण्या संदीप क्षीरसागर हे एकमेका विरोधात उभे होते.त्यामध्ये काका जयदत्त क्षीरसागर यांचा अल्पमताने पराभव झाला होता.आता 2024 विधानसभा निवडणुकीमध्ये तीनही क्षीरसागर एकमेकासमोर उभे आहेत. तिनही क्षीरसागर हे प्रचारास लागले असून, मतदाराच्या गाठीभेटी घेण्यावर भर देत आहेत. त्यामुळे शहरातील,मतदारसंघातील नागरिक हे क्षीरसागर मुक्त करण्याची हीच वेळ असल्याचे उघडपणे बोलत आहेत.40 वर्ष एक हाती नगरपालिकेवर वर्चस्व असताना देखील बीड शहराला ऐन पावसाळ्यात देखील बारा दिवसाला पाणी, बार्शी रोड, कारंजा रोड, स्टेडियम खड्डे तसेच शहरातील विविध रस्त्यावरील खड्डे , जागोजागी साचलेले कचऱ्याचे ढीघारे, गटार नाली तुंबून रस्त्यावर येणारे पाणी याकडे तीनही क्षीरसागरांचे दुर्लक्ष असल्याने नागरिक उघडपणे नाराजी व्यक्त करत आहेत.तसेच पक्षश्रेष्ठींना देखील फक्त क्षीरसागर का हवे आहेत? दुसरा एखादा लायक उमेदवार नाही का? असा सवाल बीड मतदार संघातील नागरिकांना पडला आहे. त्यामुळे शहरातील नागरिक यावेळी क्षीरसागर मुक्त करणार असल्याची चर्चा करत आहेत.