ताज्या घडामोडी
सावकाराच्या जाचास कंटाळून गळफास घेऊन जीवन संपवले.
मृताच्या खिशात आढळली सावकाराच्या नावाची लिस्ट.

आनंद वीर(प्रतिनीधी) बीड शहरातील पेठ बीड पोलीस स्टेशन हद्दीतील बहिरवाडी, आयोध्या नगर भागात राहणारे मंगेश बाळासाहेब बोबडे वय 30 वर्षे.यांनी सावकारांच्या जचास कंटाळून राहत्या घराच्या पाठीमागील पत्र्याचे शेडमध्ये दुपारी पाच वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन जीवन संपवले. बोबडे यांचा कापूस जिनिंगचा व्यवसाय होता. कापसाच्या व्यवसायात नुकसान झाले होते. जवळपास घेतल्याची माहिती पेठ बीड पोलीस ठाण्याचे कर्मचारी पो.देशमुख,पो.सोनवणे यांना मिळाली असता प्रेत बीड शासकीय रुग्णालयात शिवविच्छेदनासाठी नेण्यात आले. स्वतःच्या खिशामध्ये सावकाराच्या दादास कंट्रोल आत्महत्या करत आहे असे पत्र सापडले असून पुढील तपास API उबाळे करत आहेत.